Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमडिलगेत माजी ग्रामविकास मंत्री आम. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त.- होम - हावन...

मडिलगेत माजी ग्रामविकास मंत्री आम. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त.- होम – हावन अभिषेक.

मडिलगेत माजी ग्रामविकास मंत्री आम.हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त.- होम – हावन अभिषेक.

आजरा.- प्रतिनिधी.

कागल विधानसभा मतदारसंघातील मडिलगे तालुका आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी ग्रामविकास मंत्री आम. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने ग्रामदैवत भावेश्वरी देवीला होम हवन व अभिषेक घालून आलेले संकट दूर करून उदंड आयुष्य लाभावे म्हणून ग्रामदैवताला साकडे दि ३० रोजी सकाळी ९ वा. घातलण्यात येणार आहे..

मागील अनेक दिवसापासून ईडीच्या माध्यमातून अनेक संकटे कुटुंबावर लादत आहेत. ती फक्त त्यांच्या पर्यंत मर्यादित न ठेवता कुटुंबातील सर्व सदस्यांच्यावर चौकशी करून नाहक त्रास देत आहे. या निषेधार्थ व माजी ग्रामविकास मंत्री आम. श्री मुश्रीफ यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकट दूर व्हावे यासाठी हा होम हवन व अभिषेक करण्यात येणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दीपक देसाई यांनी सांगितले. श्री. मुश्रीफ यांचे मडिलगे हे गाव दत्तक गाव असून या गावांमध्ये अनेक योजनेसह विकास कामाच्या माध्यमातून गाव समृद्ध केले आहे.
कार्यक्रमासाठी माजी सभापती भिकाजी गुरव, माजी उपसभापती दिपक देसाई, माजी सरपंच के. व्हि. येसणै, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आजरा ता.अध्यक्ष अनिकेत कवळेकर, सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच सुशांत गुरव, ग्रामपंचायत सदस्य, सह देवस्थान समिती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हा होम हवन अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.