घाटकरवाडीतील महिलेस शेतामध्ये ऊस भांगलन करतांना गवा या वन्य प्राण्याने धडक दिल्याने जखमी.👇
आजरा.- प्रतिनिधी.

घाटकरवाडी तालुका आजरा येथील उज्वला जानबा यादव अंदाजे वय ४० वर्ष या महिलेस डोंगरवाडी नावच्या शेतामध्ये ऊस भांगलन करत असताना आज दि. २९/३/२०२४ रोजी सकाळी १० वा गवा या वन्य प्राण्याने धडक देऊन जखमी केले आहे. ग्रामीण रुग्णालय आजरा येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना शासकीय उपजिल्हा आरोग्य केंद्र गडहिंग्लज मधे पुढील उपचाराकरिता पाठवणेत आले आहे.
वनक्षेत्रपाल आजरा कार्यालयाकडून माहिती प्राप्त झाली
