२ एप्रिल रोजी गडहिंग्लज येथे संविधान संवादशाळा या कार्यशाळेचे आयोजन – संग्राम सावंत
गडहिंग्लज. – प्रतिनिधी.
संविधान सन्मान परिषद,मुक्ती संघर्ष समिती,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती व कास्ट्राईब शिक्षक संघटना यांच्या वतीने एकदिवसीय संविधान संवादशाळा आयोजित केलेली आहे. यावेळी संविधान सन्मान परिषद व संविधान पोस्टर्स प्रदर्शन यांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या संविधान कार्यशाळेत चला संविधान समजून घेऊया.ही भूमिका घेऊन संवादशाळेत सोप्या शब्दांत संविधानाची तोंड ओळख.विविध उपक्रमाद्वारे (ऍक्टिव्हिटी) संविधान संवाद. खेळ, गाणी, गप्पागोष्टी, चर्चा होणार आहे.
संविधान सन्मान परिषद व संविधान पोस्टर्स प्रदर्शन उद्घाटन प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे (लेखक कलावंत) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दशरथ दळवी,विकास पाटील, भारती शिंदे व Adv.आप्पासाहेब जाधव उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची व परिषदेची भूमिका मांडणी संग्राम सावंत (मुख्य संघटक- संविधान सन्मान परिषद) हे करणार आहेत. या कार्यशाळेत संवादक राजवैभव शोभा रामचंद्र (सचिव,लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र)व कृष्णात स्वाती (राज्य सरचिटणीस- महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती) हे ही संविधान संवादशाळा घेणार आहेत. ही कार्यशाळा डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल,गडहिंग्लज येथे रविवार २ एप्रिल,२०२३ रोजी सकाळी १०.ते सायं.५.३० वाजेपर्यंत-असून या संविधान संवादशाळा कार्यशाळेसाठी पूर्वनोंदणी साठी ९८८१६३८३८५ या नंबरवर संपर्क करावा.असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक
संविधान सन्मान परिष ,मुक्ती संघर्ष समिती,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती व कास्ट्राईब शिक्षक संघटना, संजय घाटगे, संघर्ष प्रज्ञावंत, दिंगबर विटेकरी,वसंत शेटके,राजेंद्र पताडे,प्रा.परसु गावडे, भिमराव तराळ,अबुसईद माणगावकर, विजय कांबळे, काशिनाथ मोरे, राहुल दास विनायक कांबळे आदि सदर परिषदेचे आयोजक आहेत.
