कोरोणाच्या पार्श्वभूमीवर. संवेदना फाउंडेशने राबवला रक्तदान शिबिराचा उपक्रम..( ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान. )
आजरा. प्रतिनिधी.दि.९
आजरा येथील संवेदना फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले. कोरोणा महामारीच्या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी गरज लागत आहे. त्यामुळे संवेदना फाउंडेशन आजरा या सामाजिक संस्थेने रक्तदात्यांना आवाहन केले होते.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत आजरा तालुक्यातील नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य केले. अर्पण रक्तपेढी आणि श्री केदारी रेडेकर ब्लड स्टोरेज यांचे सहकार्य देखील रक्तदान शिबिराला मिळाले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन स. पो. निरीक्षक बालाजी भांगे, युवा नेते अनिरुद्ध रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संवेदनाचे प्रतिनिधी आणि कार्यक्रमाचे सवन्यमय डॉ. प्रवीण निंबाळकर यांनी संवेदनाच्या कार्याची माहिती उपस्थितांना यावेळी दिली. लवकरच १८ वर्षावरील नागरिकांसाठी ही लस दिली जाणार आहे तत्पूर्वी रक्त संकलन करणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे संवेदनाने कोरोणा लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याची भावना पोलीस निरीक्षक श्री भांगे यांनी व्यक्त केली यावेळी अनिरुद्ध रेडेकर यांनी संवेदनाचे उपक्रम कौतुक केले अजंनाताई रेडेकर यांनीही रक्तदान शिबिराला भेट देऊन युवकांचे कौतुक केले.
【 या उपक्रमातील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे संवेदना फाउंडेशनच्या सदस्यांनी मुंबई येथून कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकलेल्या युवकांनी मुंबईतून रक्तदान करून एक नवा आदर्श निर्माण केला. 】
पंडित दीनदयाळ हायस्कूल मध्ये संपन्न झालेल्या या शिबिरात प्रसंगी युवकांमध्ये उत्साह दिसत होता.
या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. यामध्ये आजरा तहसीलदार विकास अहिर यांनी देखील रक्तदान केले. संवेदना फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी. डॉ. प्रविण निबाळकर, संजय हरेर, राजेश हरेर, अमर पाटील, अरविंद अजगेकर, अनिल पंडित, एम. के. राणे, रामराव गावडे, सुधाकर प्रभू, सुरेश देशमुख, डॉ. अमित बेळगुंदकर, संजय भोसले, मनिषा भादवणकर, सुरेश पंडित, अनिल देसाई, सुरेश पालकर, शशिकांत पंडित, सह संवेदना सदस्य यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
संविधानाचे फाउंडेशनचे अध्यक्ष अण्णाप्पा पाटील यांनी सर्वांचे सोशल मीडियाद्वारे आभार मानले.