अवचित मदर्स डे- निमित्ताने सर्व मातांना कविता अर्पण..
सौ. वर्षा विजय तावडे.
आजरा… मुंबई,
आजरा. प्रतिनिधी.
। l आई ll
आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर
तुझ्याच उदरात मला भेटला परमेश्वर
आई तू अथांग प्रेमाचा सागर
आम्हांला दिली तू सुखाची चादर !!
नणंद भावजईचा नुसताच फुललेला मळा
त्यात लेकीं सुना आणि जावई यांचा गोतावळा
पाहुणचाराचा तू कधी केला नाही कंटाळा
तुझ्या सोबत सुखी आहे तुझा लडिवाळा !!
माहेरी आम्ही जाताना एक बॅग घेऊन जातो
माहेर वरून येताना हात, कंबर मोडेल इतक्या बॅग घेऊन येतो
तरीही ती बोलते आजून काय बसते का बॅगेत थांब जरा बघतो
आईने दिलेल्या शिदोरीत आमचा अधिक महिना निघतो!!
आई नावचं ईश्वरी घरी लागलं आहे तोरण
तिच्याचं प्रेमाने सजले आहे घर आणि अंगण
निर्मळ आहे माझ्या ममतेची साऊली
आमच्या सोबत आहे अनंताची रखुमाई माऊली!!
माया ममता आणि मातृत्वाचं आई आहे देणं
सांगा आई पेक्षा श्रेष्ठ आहे कोणतं लेणं
तुझ्या उदरी जन्म घेऊन मिळाले पुण्य
आता आम्हांला तुझी सेवा करायची हे करशील ना मान्य!!
नात्यातील, देवातील ही तुझं नातं थोरं
कंठातील सरस्वतीला लिहण्याचा पडला घोरं
हृदयातून हाक घालते आई तुझी पोरं
तुझं रूपं आणि प्रेम चोरणारी मी तुझी लाडकी चोर !!
धन्यवाद.
सौ. वर्षा विजय तावडे.
( माझ्या आईला आणि समस्त विश्वातील मातेला ही माझी कविता अर्पण. )