बाळेघोल खून प्रकरणातील आरोपीला नऊ मार्चपर्यंत पोलीस कोठडी.- गावठी बंदूक विकत देणारा संशयित आरोपी विनायक सुतार आजरा तालुक्यातील.👇
मुरगूड / ओंकार पोतदार
गावठी बनावटीच्या बंदुकीने गोळी घालून ठार मारणा-या आरोपी विकास मोहिते यास अटक करण्यात आली. त्याला मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो, कागल यांचेसमोर हजर केले असता त्याला दि. ०९/०३/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाली. पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार मयत भरत बळीराम चव्हाण (वय 35) रा बाळेघोल ता कागल हा व बाळेघोल पैकी रामपूरवाडी येथे राहणारा ओंकार शिवाजी जाधव हे दोघे विहीतील गाळ काढणेच्या यारी मशिनच्या कामावर चिंगरी ना पाणंद रस्त्याने मोटरसायकलवरून जात असताना, मयत भरत चव्हाण याचे गाडीचे आडवी विकास हेमंत मोहीते याने मोटरसायकल आडवी लावली. त्यानंतर आरोपी विकास मोहिते याने मयत भरत चव्हाण याचे गाडीवर बसलेला फिर्यादी ओंकार जाधव यास धमकावून तेथून निघून जाणेस सांगितले. ओंकार जाधव हा तेथून थोडे अंतर जाताच मयत भरत चव्हाण व आरोपी विकास मोहिते यांचेत जोरजोरात वादावादी सुरु झाली व आरोपी विकास मोहिते याने सोबत आणलेल्या गावठी बनावटीच्या बंदुकीने मयत याचे डोक्यावर गोळी झाडली. सदर गोळीबारामध्ये भरत चव्हाण हा जागीच मयत झाला. सदर बाबत पोलीस स्टेशनला बातमी मिळताच घटनास्थळी मुरगूड पोलीस स्टेशचे अधिकारी व अमंलदार हजर झाले. घटनास्थळ पंचनामा व मयत यांचा पंचनामा झालेनंतर प्रेत पोस्टमार्टम करीता सीपीआर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे पाठवण्यात आले .खून झालेल्या घटनास्थळास पोलीस अधीक्षक कोल्हापूर शैलेश बलकवडे, जयश्री देसाई अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर, संकेत गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर यांनी भेट देवून तपासाबाबत सुचना दिल्या. आरोपी याचा शोध घेत असता तो कापशी ते आलाबाद रोडने जात असलेचे समजलेने त्यास त्यास ताब्यात घेवून अटक केली. आरोपी विकास मोहिते यास अटक करुन सदर दरम्यान आरोपीत यांचेकडे तपास करत असताना आरोपी विकास मोहिते याने गुन्हयामध्ये वापरलेली गावठी बनावटीची सिंगल बॅरेल बंदुक हि गावातील विहीरीत टाकलेबाबत सांगितली. त्यानुसार विहिरीमध्ये शोध घेतला असता, बंदुक मिळून आली. तसेच गुन्हयात वापरलेली बंदुक व काडतुस हि त्याने कोठून खरेदी केली याबाबत तपास असता, सदरची बंदुक व काडतुस हि त्याने विनायक लक्ष्मण सुतार, मुळ गांव मडीलगे, ता. आजरा सध्या रा. पिपळगांव बु., ता. भुदरगड, जि. कोल्हापूर याचेकडून खरेदी केले असलेबाबत मुरगूड पोलीस ठाणंकडील पोलीस उपनिरीक्षक श्री. आर. ए. वाघमारे यांचे पथक बनवून आरोपी याचा शोध घेणेसाठी रवाना केले आहे. सदर गुन्हयाचे तपास सपोनि.विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे, पोलीस अमंलदार आनंदा कुंभार, संदिप ढेकळे, सचिन निकाडे, राम पाडळकर, नारायण देसाई, राहूल देसाई, स्वप्निल मोरे व मधुकर शिंदे अधिक तपास करीत आहेत.
