आजरा नगरपंचायतला निधी. – खास. संजय मंडलिक
【 ओल्या कच-यापासून वीज निर्मितीसाठी १ कोटी ३५ लाखचा निधी. 】
आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील नगरपंचायत हद्दीतील ओल्या कच-यापासून वीज निर्मितीसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती शिवसेनेचे खास संजय मंडलिक यांनी दिली.
राज्यातील नगरपरिषदांना राज्य शासनाच्या वतीने वैशिष्ट्येपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते.या योजने अंतर्गत आजरा नगरपंचायतीला १ कोटी ३५ लाखांचा निधी मिळाला आहे.
सदर निधीतून आजरा नगरपंचायत हद्दीतील ओल्या कचरा पासून वीज निर्मिती करण्यात येणार आहे.
खास मंडलिक यांनी नगरविकास मंत्री यांना निवेदन देऊन निधीची मागणी केली होती.
आजरा नगरपंचायत हद्दीतील ओला कचरा गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
आजरा शहरामध्ये एकूण पाच टन घनकचरा जमा होतो. यामध्ये २ टन सुखा तर ३ टन ओला कचरा जमा होतो.