आजरा बस स्थानकावर एस.टी. ची वाट पाहणाऱ्या.- त्या महिलेला सुखरूप सोडले घरी.
आजरा.प्रतिनिधी. दि ८
सामाजिक बांधिलकी जपत आजरा येथील मनसेच्या महिला आघाडी ता. अध्यक्ष सरिता सावंत, व सामाजिक कार्यकर्त्या मनसे शहराध्यक्ष पुनम भादवणकर यांनी मागील आठ- दहा दिवस आजरा बसस्थानकावर एसटीची वाहतूक बंद झाल्यामुळे मूळ गावी जाण्याचा प्रवास थांबला व तुळसाबाई धोंडिबा वडर वय ६७ रा. शिराळा जि. सिंधुदुर्ग हि महिला मागील आठ दिवसापासून आजरा जि. कोल्हापूर या बसस्थानकावर बसून एस. टी. ची वाट बघत राहिलेल्या त्या महिलेला काही नागरिकांनी तर रिक्षा चालक राजु चंदनवाले यांनी बस स्थाकात झोपण्याची व्यवस्था करुन नियमीत जेवन देऊन सहकार्य केले. तर या महिलेला तिच्या भावाकडे मौजे. चिकलहाळ ता. निपाणी या गावी जायचे होते. कोरोणाच्या पार्श्वभूमी एस. टी वहातुक बंद असलेने एकटीच बसस्थानकावर राहत होती. सदर महिलेचे विचारपूस अनेक नागरिकांनी केली परंतु काही नागरिकांनी तिला तिच्या मूळ गावी किंवा नातेवाईक यांच्याकडे सोडण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. शेवटी आजरा येथील दोन धाडसी महिला सौ सावंत व भादवणकर यांनी आजरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांची भेट घेऊन त्या महिलेस ती ज्या ठिकाणी जाणार आहे. त्या ठिकाणी सोडुन येतो यासाठी श्री. भांगे यांनी सहकार्य केले व मडिलगे येथील समीर येसणे यांनी आपल्या गाडीचे भाडे न घेता. त्या महिलेला निपाणी येथील मौजे. चिकलहाळ येथे तिच्या भावाच्या घरी सोडण्यासाठी सहकार्य केले. यामध्ये आजरा येथे होमगार्ड सेवेत असणाऱे अर्जुन बाडकर यांनीही सोबत येऊन त्या महिलेला दि. ७ रोजी सुखरूप पोचविण्यासाठी सहकार्य केले.
या घटनेतून कोरोणा काळात अजूनही माणुसकी जिवंत आहे. हा संदेश सामाजीक बांधिलकी जपणार्या या दोन्ही महिला, व समीर येसणे यांनी गेल्या चार पाच दिवसापासून सतत त्या वृद्ध महिलेला जेवण देणे तुम्हाला सोडून येतो आमच्या सोबत चला अशा विनवण्या करत होत्या परंतु सदर महिला मला कुणाचे उपकार नकोत मी एस. टी चालू झाल्यानंतरच जाईन असा हट्ट धरून बसली अखेर अवकाळी पाऊस, वारा होणाऱ्या विजेच्या आवाजाला घाबरून व आजरा पोलिसांनी विनवणी केल्यानंतर ती महिला खाजगी गाडीतून जाण्यास तयार झाली. या महिलेला विनंती करण्यासाठी आजरा तहसीलदार विकास अहिर यांनी देखील प्रयत्न केले होते. आजरा तालुक्यात सह कोल्हापूर जिल्ह्यात जनता कर्फ्यूओ असल्यामुळे दिवस-रात्र सर्व नागरिक आपल्या घरात असताना ही एकटी महिला आजरा बसस्थानकावर बसून राहत होती शेवटी सर्वांच्या सहकार्यामुळे त्या महिलेला सुखरूप पोचवता आले..
【 आजरा शहरात अजुनही तालुक्यातील ग्रामीण भागातील दोन महिला रस्त्यावरुन फिरताना दिसत आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून आपल्या मुळ गावी न जाता आजरा शहरातील एका मंदिरात निवास्थान करत आहेत. आशा महिलेची चौकशी करुन प्रशासकीय यंत्रणेने त्यांच्या घरी सोडावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.】