आजरा शहरवासीयांनी नगर विकास विभाग क्र. टिपीव्ही – शासन निर्णयाची माहिती घ्यावी.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहर नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाकडून शहर विकास योजना व नगर रचना योजना इत्यादींचे भाग नकाशे सनदा जनतेस व प्रशासकीय कार्यालयांना (राज्य शासकीय कार्यालय वगळून ) संदर्भीय क्र.२ येथील दि.२७/६/१९८४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे दराप्रमाणे पुरविल्या जात होत्या.
नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाकडून शहर विकास योजना व नगररचना इत्यादींचे भाग नकाशे सनदा तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदांच्या किमतीतील वाढ कर्मचाऱ्यांचे वेतन इत्यादीमध्ये झालेली वाढ लक्षात घेता संदर्भीय क्र.२ येथील दि.३/७/२००० शासन निर्णय सदर सुधारणा दरवाढ पुढील तीन वर्षासाठी सुधारित केली होते नगर रचना संचालकांच्या अख्यारितीत सर्व जिल्ह्यातील संबंधित शाखा कार्याकडून मंजूर प्रादेशिक योजनेनुसार व विकास योजनेनुसार नागरिकांना हित संबंधितांना भाग नकाशे झोन नकाशे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदांच्या किमतीतील वाढ कर्मचाऱ्यांचे वेतन इत्यादींचे वाढ झाल्यामुळे दरात वाढ करण्याचा प्रस्ताव विचारधारीत होता शासन सोबत जोडलेल्या कागदपत्रच्या मध्ये नमूद केल्याप्रमाणे भाग नकाशे झोन दाखले ऑनलाइन पद्धतीने जनतेला उपलब्ध करून देण्याकरता व भाग नकाशे घेऊन दाखले ऑनलाईन पद्धतीने जनतेला उपलब्ध करून देण्याकरता सुधारित दरात पुढील तीन वर्षासाठी किंवा तत्पूर्वी जरूर वाटल्यास सुधारित करण्याचा अटीवर मान्यता देत आहे. याबाबतची मान्यता याबाबतची मान्यता उपसचिव महाराष्ट्र शासन विजय चौधरी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
सदर आदेश वित्त विभागाच्या अनुपौचारीक संदर्भ क्रमांक ८५ ध्यय (३) दि. १५/५/२००० निर्णव्यान्वे सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर त्याचा सांकेतांक या २०२०१०२८११०६४८०५२५ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. असा आदेश राज्यातील सर्व नगररचना विभागाकडे दिल्याप्रमाणे आजरा येथील नगरपंचायत वतीने याबाबतच्या हरकती मागवल्या आहेत याबाबतची अधिक माहिती आजरा नगरपंचायत मध्ये उपलब्ध असून आजरा शहरातील नागरिकांनी याबाबत कोणती हरकत असल्यास आपण संबंधित विभागाची कडे अर्जाने मागणी करू शकता. नव्याने आकारण्यात आलेल्या दराबाबतची माहिती आजरा नगरपंचायत येथे फलकावर लावण्यात आलेली आहे.
