शाळा वाचवा ! शिक्षण वाचवा ! ऊर्दू हायस्कूल वाचवा!! ही भूमिका.- मुक्ती संघर्ष समितीचा संघर्ष लढा.- ऊर्दू हायस्कूलचा भ्रष्टाचार.- आजरा तहसिलवर संघर्ष मोर्चा.
आजरा. – प्रतिनिधी. २०

ऊर्दू हायस्कूलच्या भ्रष्टाचार आणि शैक्षणिक कामातील गैरव्यवहाराबाबतीत २० फेब्रुवारी रोजी संघर्ष मोर्चा – मुक्ती संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने आजरा तहसिलदार कार्यालयासमोया समोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना मुक्ती संघर्ष समितीचे संग्राम सावंत म्हणाले प्रशासक, अँग्लो उर्दू हायस्कूल आणि ज्यू. कॉलेज आजरा ता.आजरा. कोल्हापूर यांच्या सर्व कारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. व ज्यानी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे. तसेच गैरव्यवहार व अनियमितता आणि गैरकारभार केलेला आहे. यांचे सबळ व ठोस पुरावे आम्ही शासन व प्रशासनाला दिलेले आहेत. व यापेक्षा अधिक पुरावे आमच्याकडे आहेत. भ्रष्टाचार आणि शैक्षणिक कामातील गैरव्यवहार व बोगस रेकॉर्ड व कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आणि आमच्या मागण्यांची सविस्तर, सखोल आणि बीनचूक चौकशी झाली पाहिजे. तसेच गैरव्यवहार थांबविण्यासाठी सर्व संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे तसेच संस्थेत शिक्षक नियुक्ती बाबतीत झालेला भ्रष्टाचार संपलाच पाहिजे. तसेच शिक्षणाची गंगा मुस्लिम समाजातील मुलामुलींच्या मध्ये प्रामाणिकपणे पोहचली पाहिजे. ऊर्दू हायस्कूल आजरा मधील गळती थांबविण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त संस्था व प्रशासन झाले पाहिजे. व मुक्ती संघर्ष समितीच्या निवेदनातील १९ मागण्यांच्या बाबतीत शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून कायदेशीरदृष्ट्या तत्परतेने कार्यवाही करून कारवाई केली नाही. म्हणून मुक्ती संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने संघर्ष मोर्चा” काढून आंदोलन करण्याची वेळ आली. हा “संघर्ष मोर्चा डॉ.झाकीर हुसेन अँग्लो उर्दु हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा संस्थेबाबतीत निवेदन शुक्रवार दि.१३ जानेवारी,२०२३ रोजी निवेदन दिलेले होत. मात्र अद्यापही याबाबत ठोस कार्यवाही व कारवाई झालेली नाही. यामुळेच शाळा वाचवा! शिक्षण वाचवा!! संस्था वाचवा!ऊर्दू हायस्कूल वाचवा!! ही भूमिका घेऊन आम्ही मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने लढत आहोत. यासंदर्भात ठोस पावले प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली नाहीत. त्यासंदर्भात सखोल चौकशी करून कारवाई केली नाही. तर मुक्ती संघर्ष समिती यापुढे हा लढा चालुच राहणार आहे. यापुढील बेमुदत आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करणार अहोत. असे यावेळी आंदोलकांनी आपली भुमिका सांगितली. यामध्ये आर्थिक व्यवहार झाले असल्याचे देखील यावेळी आंदोलकांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, समीर खेडेकर यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध २२ मागणीचे निवेदन वरिष्ठ लिपीक यांना देण्यात आले. या मोर्चात माजी. प. स.सदस्य बशीर खेडेकर, संजय सावंत, समीर चाँद, अबुसईद मानगावकर, दिगंबर विटेकर, काँ. संजय घाटगे, शरीफ खेडेकर, युसुप मुल्ला, मोसीन तगारे, संघर्ष प्रज्ञावंत, शालेय विद्यार्थी, मुस्लिम समाजबांधव यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

