Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रखेडे मुंगूसवाडी ग्रामपंचायत विकास कामासाठी २५ लाखाचा निधी देणार. - आम. प्रकाश...

खेडे मुंगूसवाडी ग्रामपंचायत विकास कामासाठी २५ लाखाचा निधी देणार. – आम. प्रकाश आबिटकर( ३० लाख रु विकास कामाचा शुभारंभ.) [ नुतन लोकनियुक्त सरपंच सदस्याचा सत्कार समारंभ संपन्न. ]

खेडे मुंगूसवाडी ग्रामपंचायत विकास कामासाठी २५ लाखाचा निधी देणार. – आम. प्रकाश आबिटकर
( ३० लाख रु विकास कामाचा शुभारंभ.) [ नुतन लोकनियुक्त सरपंच सदस्याचा सत्कार समारंभ संपन्न. ]

आजरा. प्रतिनिधी.

खेडे व मुगुसवाडी ग्रामपंचायतसाठी यापुर्वी निधी दिला. आज काही कामाचा शुभारंभ झाला असून येणाऱ्या काही दिवसात २५ लाखाचा निधी देणार असल्याचे सांगितले ते नुतन ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच विभागातील लोकनियुक्त सरपंच सत्कार समारंभात कार्यक्रमात आम. प्रकाश आबिटकर अध्यस्थावरुन बोलताना होते. स्वागत प्रास्ताविक डॉ. अनिल देशपांडे यांनी केले. पुढे श्री आबिटकर म्हणाले प्रश्न अनेक आहेत. आपल्या जवळ विकास कामाची चिकाटी आहे. आपण सुचित केलेली विकासकामे करण्यासाठी प्रयत्न करणार व ती माझी जबाबदारी आहे. नुतन सरपंच सदस्य यांनी गावासाठी झोकून काम करावे राजकारण करण्यासाठी विश्वास लागतो व आपण पात्र आहात म्हणून आपल्याला मतदारांनी आपल्याला निवडून दिले आहे. आपन सक्षम व आभ्यासु पदाधिकारी व्हावे. मुख्यमंत्री सडक योजनेतून आपल्या गावात येणारा प्रमुख रस्ता करु तसेच चित्रीतुन जास्तीत जास्त पाणी स्थानिक आचरेकरांना मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रकल्पासाठी जमीन स्थानिक शेतकऱ्यांच्या तर तुमच्या जमीनी पाण्याखाली आल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणार, आपण जबाबदार पदाधिकारी आहात म्हणून आपल्या जबाबदारी विसरु नये. विकास कामासाठी काम करावे असे श्री. आबिटकर म्हणाले.
यावेळी आम. आबिटकर यांच्या हस्ते नुतन सरपंच तसेच माजी सरपंच तसेच विभागातील सरपंच याचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत निवडणूकीत ज्या प्रमुख कार्यकर्ते यांचे कौतुक व आभार डॉ. अनिल देशपांडे यांनी मानले
यावेळी अशोक चराटी म्हणाले. खेडे – मुगुसवाडी ग्रामपंचायतीमध्ये निधी कमी पडू देणार नाही. आपले आमदार कार्य सम्राट आहेत. आपण आज नियोजित कामाचा आराखडा समोर ठेवला आहात यासाठी नक्कीच आम. आबिटकर प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देतील नियोजन मंडातुन दहा लाखाचा निधी या गावासाठी मी देखील यासाठी प्रयत्न करिन व लवकरच त्याना कोल्हापूर जिल्हाच्या राजकारणात मोठी जबाबदारी म्हणून मंत्री पद देखील मिळणार आहे. त्यामुळे आपन निश्चिंत रहा आपला गावचा कायापालट होईल असे श्री चराटी म्हणाले यावेळी माजी सरपंच श्रीमती शारदा सावंत, उपसरपंच राहुल कातकर, तसेच नेताजी कातकर, अरुन सावंत, प्रकाश देशपांडे, रामचंद्र सावरतकर, विकास जाधव, संतोष सावरतकर, गिरीश देशपांडे, रेखा सावंत, माधुरी चौगुले, मालुताई चौगुले, सुनिता चव्हाण, माजी उपसरपंच प्रकाश चव्हाण, सह प्रमुख कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार लोकनियुक्त सरपंच संदिप देशपांडे यांनी मानले.

[ आजरा तालुक्यातील प्रमुख नेते व नतन लोकनियुक्त सरपंच, आजी – माजी सरपंच, प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यामध्ये विजयकुमार पाटील, दशरथ अमृते, अनिरुद्ध केसरकर, जी. एम. पाटील, के. व्ही. येसणे, सिंकदर दरवाजकर, संजय पाटील भादवण, विजय थोरवत, संतोष भाटले, राजु पोतणीस,आजरा जि. प. लोकनियुक्त सरपंच, मडिलगे सरपंच बापू निऊगरे सह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी प्रामुख्याने उपस्थिती लावली होती.]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.