आजरा नगरपंचायत पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता. – २६ कोटींचा निधी होणार उपलब्ध.
( आम. आबिटकर यांचा आजरा नगरपंचायत सभागृहाच्या वतीने सत्कार संपन्न.)
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील नगरपंचायत वतीने ग्रामपंचायत असताना मागील ४० वर्षांपूर्वी असलेली जुनी पाईपलाईन नादुरुस्त होत आली होती. यासाठी नवीन पाईपलाईन व्हावी. नगरपंचायत वतीने प्रयत्न चालू होते. या प्रयत्नांना यश येऊन आजरा – भुदरगड – राधानगरी विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून २६ कोटी पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने येथील नगरपंचायत वतीने आम. आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. आजरा नगरपंचायत चे नगरसेवक व अण्णाभाऊ संस्था समूहाचे नियोजन मंडळाचे सदस्य अशोक चराटी यांनी सहकारी नगरसेवक यांच्या मदतीने मागील तीन-चार वर्षापासून सातत्याने नवीन पाईपलाईन साठी प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना यश आले आहे. उर्वरित विकास कामाचा आराखडा यावेळी सभागृहात आमदार आबिटकर यांच्यासमोर श्री चराटी यांनी मांडला.

यावेळी आम. आबिटकर आजरा शहरासाठी प्रत्येक विकास कामात आमचे सहकार्य असेल नव्याने होणारे नाट्यगृह यासाठी प्रयत्न चालू आहेत. विकास कामे होण्यासाठी थोडा उशीर झाला. पण उशिरा झालेली काम ही देखील चांगल्या पद्धतीने होतात. म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी येऊ लागला आहे. चांगली कामे व्हावी. म्हणून विकास कामात उशीर होतो. प्रत्येक विकास कामासाठी धावपळ सुरू आहे. रामतीर्थ चांगलं पर्यटन व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. असे यावेळी आबिटकर म्हणाले. यावेळी नगरसेवक श्री चराटी म्हणाले आमदार अबिटकरांनी आजऱ्यावर प्रकाश पाडला. प्रदीर्घ काळानंतर अखेर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आजचा दिवस महान आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम देखील मार्गी लागले आहे. लवकरच उर्वरित काम पूर्ण होईल आम्ही सर्व नगरसेवक विकास कामासाठी सगळे एकच आहोत आजऱ्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही सर्व नगरसेवक आम. प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी राहून नक्कीच शहराचा विकास करणार आहोत. “तुम्ही आमच्या सोबत राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत” येणाऱ्या काळात शिंदे व भाजप सरकार यांच्या माध्यमातून आजरा आग्र्याचा विकास करणार असल्याचे श्री चराटी यांनी बोलताना म्हणाले. विलास नाईक यांनी स्वागत केले तर नगरसेवक आनंदा कुंभार आभार मानले या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी सर्व नगरसेवक कर्मचारी आजरा शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
