आजरा. – बहिरेवाडी
मुलाकडून आईवडिलाना मारहाण त्यात वडिलांचा मृत्यू तर आई जखमी.
आजरा. – प्रतिनिधी.
बहिरेवाडी (ता. आजरा ) येथे मुलाकडून आईवडिलाना मारहाण त्यात वडिलांचा मृत्यू तर आई जखमी झाली आहे.आईला गडहिंग्लज येथे उपचारासाठी दाखल केले आहे. तर वडिल कृष्णा गोरुले मयताचे नाव आहे. मुलगा सचिन हा संशयीत आहे.
बहिरेवाडीत गावची आज लक्ष्मी यात्रा आहे. सायंकाळी लक्ष्मी खेळणार व उद्या शनिवार जेवण अशा धामधूमीत हा प्रसंग घडला.बहिरेवाडी माध्यमिक शाळेजवळील गल्लीत ही घटना घडली आहे.वडिलांचे नाव कृष्णा गोरुले असून आई पारुबाई गोरुले जखमी आहे. खुनाचे कारण अद्याप समजले नाही.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
