Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा मडीलगेत रस्ते विकास कामाचा शुभारंभ. - माजी मंत्री आम. हसन मुश्रीफ...

आजरा मडीलगेत रस्ते विकास कामाचा शुभारंभ. – माजी मंत्री आम. हसन मुश्रीफ यांचा १ कोटी २५ लाखाचा ग्रामविकास निधी.

आजरा मडीलगेत रस्ते विकास कामाचा शुभारंभ. – माजी मंत्री आम. हसन मुश्रीफ यांचा १ कोटी २५ लाखाचा ग्रामविकास निधी.

आजरा. – प्रतिनिधी.

कागल विधानसभा मतदार संघातील मडिलगे ता. आजरा या दत्तक गावाला माजी मंत्री आम. हसन मुश्रीफ यांनी १ कोटी २५ लाखाचा ग्रामविकास निधी दिला असून या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे आजरा तालुक्याचे नेते वसंतराव धुरे यांच्या हस्ते दि. ४ रोजी संपन्न झाला. स्वागत सरपंच बापू निऊगरे यांनी केले तर प्रास्ताविक माजी उप.सभापती दिपक देसाई यांनी केले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री धुरे म्हणाले या मडिलगे गावाला आमदार हसन मुश्रीफ यांच्या फंडातून भरपूर निधी देऊन विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. यासाठी आपल्या गावातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण आम. मुश्रीफ यांच्या पाठीशी राहिले पाहिजेत येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या पाठीशी राहून आजरा तालुक्यासह आपल्या विभागातील उमेदवाराच्या पाठीशी राहावे. ग्रामपंचायत निवडणूक झालेली आहे. यामध्ये गटात तटाची असलेली नाराजी विसरून जाऊन सर्वानी पुन्हा एका झेंड्याखाली येऊन काम करावे. विकास कामासाठी लागणारा निधी आपल्या गावाला कमी पडू दिला जाणार नाही. असे श्री धुरे बोलताना म्हणाले. यावेळी माजी सभापती भिकाजी गुरव यांनी माजी मंत्री आम. हसन मुश्रीफ यांनी यापूर्वी दिलेला निधी व त्यांच्या कार्याचा व मडिलगे गावासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असून भविष्यात हे मडिलगे गाव नेहमी आम. श्री मुश्रीफ यांच्या पाठीशी राहिल असे श्री. गुरव म्हणाले. यावेळी माजी उपसभापती शिरीष देसाई, कारखाना संचालक मारुती घोरपडे, काशिनाथ तेली, माजी सरपंच गणपती आरळगुंडकर,इजि. अनिकेत कवळेकर, युवराज येसणे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.