Homeकोंकण - ठाणेआता आजरा रामतीर्थ तीर्थस्थळावर आकारला जाणार कर - संयुक्त वन व्यवस्थापन नागरी...

आता आजरा रामतीर्थ तीर्थस्थळावर आकारला जाणार कर – संयुक्त वन व्यवस्थापन नागरी समितीने केली कर वसुली.

आता आजरा रामतीर्थ तीर्थस्थळावर आकारला जाणार कर – संयुक्त वन व्यवस्थापन नागरी समितीने केली कर वसुली.

संपादक. – संभाजी जाधव.

आजरा येथील रामतीर्थ तीर्थस्थळ या तीर्थस्थळावर वाढते पर्यटक व ज्या ठिकाणी प्रशासनाच्या दुर्लक्ष होत होतं हे नाकारता येत नाही. तर पर्यटकांच्या कडून होत असलेली हूलडबाजी यावर देखील नियंत्रण राहावं व चांगल्या पद्धतीचं पर्यटन स्थळ होण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हापूर वन विभाग कोल्हापूर वनपरिक्षेत्र आजरा यांची संयुक्त वन व्यवस्थापन ( नागरी ) समितीने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्याकडून कर आकारला जात आहे. मागील दोन दिवसापूर्वी पासून कर आकारण्यास सुरुवात केली आहे. आजरा नगरपंचायत व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर समिती स्थापन केली असल्याचे समजते. यामध्ये मानसी वयानुसार वेगवेगळे कर आकारले जाणार तर शैक्षणिक सहल तसेच व्हिडिओ शूट, फोटोशूट, लहान मोठी व याचे दर वेगवेगळे असून पर्यटकांना गाईड लागल्यास याचा दर वेगळा असणार आहे. यामुळे आता पूर्वीप्रमाणे टाईमपास म्हणून आपण रामतीर्थ तीर्थस्थळावर जात असाल तर आपल्याला निश्चितपणे कर द्यावा लागेल. सद्यस्थितीला या पर्यटन स्थळावर कर आकारला जात असल्यामुळे स्थानिक आजरा तालुक्यातील नागरिक नाराज असून स्थानिक नागरिकांना कर द्यावा लागू नये अशी समितीकडे नागरिकांची मागणी आहे. परंतु या ठिकाणी या समितीमुळे पर्यटकाकडून होत असलेली हुलटबाजीला आळा बसणार आहे. असेही बोलले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.