Homeमुंबईकोरोना योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद. समरजित घाटगे यांचे गौरवोद्गार.

कोरोना योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद. समरजित घाटगे यांचे गौरवोद्गार.

कोरोना योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद. समरजित घाटगे यांचे गौरवोद्गार

आजरा, प्रतिनिधी.दि.६

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीतही स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना योद्धे रूग्णसेवा करीत आहेत. कोरोना योद्ध्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले.
येथील कोविड केअर सेंटर भेटीवेळी ते बोलत होते.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना यांची माहितीही त्यांनी घेतली. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी अण्णाभाऊ उद्योग समूहाचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकआण्णा चराटी, नगराध्यक्षा ज्योत्सना चराटी, तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ धनंजय देशमुख तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ यशवंत सोनवणे, तहसीलदार विकास आहिरे, आदी उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले,कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा अधिक रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत अगदी सफाई कामगार वॉचमन यांच्यापासून अधिकारी पातळीवरील कोरोना योद्धे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाधित रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्व पात्र व्यक्तींनी लसीकरण करून घेऊन सामाजिक कर्तव्य पार पाडावे. कोरोना प्रतिबंधक लसीचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू. तसेच शाहू साखर कारखान्या मार्फत चालवण्यात येत असलेल्या कोविड सेंटरवरही आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवू.अशी ग्वाही त्यांनी दिली.
आणि जागेवरच थांबून राजेंनी केला ‘त्यांच्या’ सेवा कार्याला सलाम….!

कोविड केअर सेंटर मध्ये प्रवेशद्वारातून आज जात असताना एका टेम्पोतून ऑक्सिजनचे टॅंक उतरण्याचे अतिशय जिकरीचे असलेले काम आठ ते दहा कर्मचारी करीत होते.यावेळी एकमेकाला आवाजाने इशारे देत होते. त्यामुळे त्या ठिकाणी काहीसा गलका सुरू होता. याठिकाणी टेम्पोतून हे ऑक्सीजन टॅंक सुरक्षितपणे खाली उतरेपर्यंत राजे जाग्यावरच थांबले.त्यामुळे त्यांच्यासोबतचे वैद्यकीय अधिकारी व कार्यकर्तेही थांबले. या कर्मचाऱ्यांची सुरू असलेली कसरत त्यांनी पाहिली.आणि ते सुरक्षितपणे उतरून झाल्यावर या कर्मचाऱ्यांची कौतुक करून त्यांच्या सेवावृत्तीला एकप्रकारे सलामच केला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसह उपस्थितांनी राजेंच्या या दिलदारपणाचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.