राज्यात १ लाख ४७ हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह ७५ हजार मुलं केवळ २ महिन्यात संक्रमित झाली
मुंबई. प्रतिनिधी. ०६ मे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. व्हायरसने आता बालकांनाही विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाच्या आकड्यांनुसार राज्यामधून 1 ते 10 वर्षांच्या 1 लाख 47 हजार 420 मुले आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेले आहेत. मुलांमध्ये संक्रमण पसरण्याचे प्रकरण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळाले.
आरोग्य विभागानुसार, राज्यात दररोज जवळपास 500 मुले कोरोना संक्रमित आढळत आहेत. राज्यात 11 ते 20 वर्षांचे 3 लाख 33 हजार 926 बालके आणि तरुण आता व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. मुंबईमध्ये बालकांमध्ये संक्रमणाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. BMC च्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आले आहे की, गेल्या वर्षी 0 ते 10 वर्षांचे 11,080 मुले कोरोना संक्रमित आढळले आहेत आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे. नायर हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक डिपार्टमेंटच्या हेड डॉ. सुषमा मलिक म्हणाल्या की, पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.5 ते 2 टक्के जास्त आहे. ज्या बालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्यातील अनेकांना निमोनिया होता. BMC कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी बालके मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त बाहेर खेळत आहेत. यामुळे ते जास्त संक्रमित झाले आहेत.
