१९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत आजरा हायस्कूलची वारी. ( वैयक्तिक पाच पारितोषिकासह प्रथम.) प्रथम क्रमांक पटकावला. किरण तानाजी पाटील यांच्या श्रिरंग या भुमिकेने सर्वत्र कौतुकाची थाप.
१९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत आजरा हायस्कूलची वारी. ( वैयक्तिक पाच पारितोषिकासह प्रथम.) प्रथम क्रमांक पटकावला. किरण तानाजी पाटील यांच्या श्रिरंग या भुमिकेने सर्वत्र कौतुकाची थाप.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा.येथील जनता एज्युकेशन सोसायटी संचलित, आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संजय शिंदे लिखित वारी बालनाट्यने प्रथम क्रमांक पटकावला. संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर व विष्णूदासभावे नाट्यगृह सांगली येथे ३ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत अतिशय जल्लोषात सादर झालेल्या स्पर्धेत एकूण ४० बालनाट्य सादर झाली. यामध्ये आजरा हायस्कूलने सादर केलेल्या वारी बालनाट्यने या स्पर्धेत आपली मोहर उमटवली. वैयक्तिक पाच पारितोषिकासह प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये किरण तानाजी पाटील यांच्या श्रिरंग या भुमिकेने व वेदिका विजय पोतदार हिच्या मॅडम या भुमिकेने रसिक श्रोत्यांना खुर्चीला खेळवून ठेवले वैयक्तिक मध्ये दिग्दर्शन प्रथम श्री विजय पोतदार, प्रकाशयोजना प्रथम श्री संतोष कालेकर, नेपथ्य प्रथम श्री तानाजी पाटील,रंभुषा प्रथम श्री आय के पाटील अभिनयाचे रौप्यपदक कु वेदिका विजय पोतदार यांनी पटकाविले या संघात एकूण ३० कलाकार सहभागी झाले होते. नाट्याचे दिग्दर्शन विजय पोतदार यांनी केले होते तर निर्मिती मुख्याध्यापक शिवाजी येसणे वेशभूषा भाग्यश्री पाटील, रंगमंच व्यवस्था अनिल नाईक, बाबासाहेब सुतार, प्रकाश ओतारी, संगीत संयोजन सुरज पावले यांनी केले कलाकार आर्या वाटवे, खदिजा मुल्ला, श्रीनिवास दांडगे, यश कुंभार, समीर वरेकर,अक्षरा पाटील, नेवेली यादव, श्रृती कुंभार, गतिमान अडकूरकर, संस्कृती कुंभार, पियुष केसरकर, कुणाल विभुते, सनिष्का पाटील, विजयालक्ष्मी सुतार, अक्षता कांबळे, सानिका माने, अनुष्का कांबळे गौरी तिप्पट श्रावणी दोडमणी, आदिती बातकांडे,अमन देसाई, साद शेख, रामचंद्र वास्कर, उमर गोडेवाले, ओम ओतारी आर्यन भोसले, श्लोक तिप्पट, राजविर पोतदार यांनी आपली कला सादर केली तर उपमुख्याध्यापक बाळकृष्ण दरी पर्यवेक्षक संभाजी होलम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तर संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ अनिल देशपांडे, सचिव रमेशआण्णा कुरुणकर सर्व संचालक यांची प्रेरणा मिळाली तर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.कला शिक्षकाचा मुलगा अखेर पहिल्या क्रमांकाचा कलाकार ठरला.आजरा हायस्कूल येथील कलाशिक्षक म्हणून रुजू असणारे तानाजी पाटील यांचा मुलगा याने प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये किरण तानाजी पाटील यांच्या श्रिरंग या भुमिकेने व वेदिका विजय पोतदार हिच्या मॅडम या भुमिकेने रसिक श्रोत्यांना खुर्चीला खेळवून ठेवले वैयक्तिक मध्ये दिग्दर्शन प्रथम विजय पोतदार या सर्व कलाकारांच जिल्ह्यात राज्यात कौतुक होत आहे.