Homeकोंकण - ठाणेआजऱ्यात अंधांसाठी स्वयंसिद्धता कार्यशाळानेत्रदान चळवळीतर्फे २९ व ३० जानेवारीला आयोजन : अंधांच्या...

आजऱ्यात अंधांसाठी स्वयंसिद्धता कार्यशाळानेत्रदान चळवळीतर्फे २९ व ३० जानेवारीला आयोजन : अंधांच्या नेत्र तपासणीचेही नियोजन

आजऱ्यात अंधांसाठी स्वयंसिद्धता कार्यशाळा
नेत्रदान चळवळीतर्फे २९ व ३० जानेवारीला आयोजन : अंधांच्या नेत्र तपासणीचेही नियोजन

आजरा.: – प्रतिनिधी.

मरणोत्तर नेत्रदान चळवळीतर्फे आजरा तालुक्यातील अंधांसाठी मोफत स्वयंसिद्धता कार्यशाळा होणार आहे. २९ व ३० जानेवारीला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत येथील जे. पी. नाईक व विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या चैतन्य सांस्कृतिक सभागृहात ही कार्यशाळा होईल. अंधांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते स्वागत थोरात (मुंबई) व स्वरुपा देशपांडे (पुणे) मार्गदर्शन करणार आहेत. पंचायत समिती आरोग्य विभागाच्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यशाळेत अंधांची नेत्र तपासणीही केली जाणार आहे.
अंधांनी पांढरी काठी कशी वापरावी, पायऱ्यांची रचना समजून घेऊन पायऱ्या कशा चढायच्या-उतरायच्या, प्रत्यक्ष रस्त्यावर पांढरी काठी घेऊन सुरक्षीतपणे कसे चालायचे, भाज्या-फळे कशा ओळखाव्यात, वेगवेगळी धान्ये, कडधान्ये, खाद्यपदार्थ कसे ओळखावेत, आवाजावरुन पक्षी, प्राण्याची ओळख पटविणे, दिशा कशा ओळखाव्यात, स्नायूंची लवचिकता वाढविण्यासाठी व्यायाम प्रकार, इतर ज्ञानेंद्रियांचा सक्षमपणे वापर कसा करावा यासह दैनंदिन जीवनात वावरताना येणाऱ्या विविध अडचणींवर मात कशी करावी याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
तसेच स्वयंसिद्धता कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी गडहिंग्लज येथील अंकूर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलतर्फे अंधांची नेत्र तपासणी केली जाईल. नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य असणाऱ्या अंधांवर पुढील उपचार केले जाणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होणारे अंध व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच अंधांना पांढऱ्या काठीचे मोफत वितरण केले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी अंधांच्या नातेवाईकांनी रमेश देसाई (मो. ९७६५५०२०२७) व सागर पाटील (मो. ९९२३८३७०५६) यांच्याशी साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.