परखंदळे ता.शाहूवाडीत नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य. – सत्कार समारंभ संपन्न.
शाहुवाडी. – प्रतिनिधी.
परखंदळे (ता.शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे संपूर्ण पॅनेल विजयी झाल्याबद्दल सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्यांचा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला.
परखंदळे गावच्या लोकनियुक्त सरपंच पदी सिताराम संभाजी पाटील व उपसरपंच पदी आनंदा चंद्राप्पा लव्हटे तसेच ग्रामपंचायत सदस्य पदी आनंदा मोरबाळे, रजंना कांबळे, जयश्री लव्हटे, दिपिका दळवी, वनिता पाटील, सुनिता रामोशी, प्रियांका लव्हटे यांची निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
ग्रामपंचायत स्तरावर सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. आपले अधिकार,कर्तव्ये ग्रामपंचायतीचे दप्तर समजल्यास चांगले काम करता येईल. त्यासाठी नुतन सरपंचांनी गावाचा अभ्यास करून सर्व सदस्यांची एकजूट कायम ठेवून गावाचा विकास साधावा असे मत आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी व्यक्त केले..
तसेच गेली अनेक वर्षे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे, त्यामाध्यमातून आपल्या गावात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत, गावच्या विकासासाठी यापुढेही मी प्रयत्नशील असून जास्तीत जास्त निधी देऊन विकासकामे मार्गी लावू, ग्रामस्थांच्या मागणीनुसार विकासकामांना निधी दिला जाईल असे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर जि.प.चे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),शाहूवाडी पंचायत समितीचे सदस्य अमर खोत (आप्पा),माजी सरपंच अश्विनी उत्तम दळवी,कॅप्टन आकाराम पाटील,वसंत दळवी,शिवाजी खोत,चंद्रकात लव्हटे,अर्जुन पाटील,डॉ.विजय पाटील,आनंदा लव्हटे,राजेश पाटील,विठ्ठल नाईक,सुहास कोल्हापुरे,शिवाजी कोल्हापुरे,नितिन पाटील,उत्तम दळवी,भिमराव परीट,बाबुराव सुतार,आनंदा निनु पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते…
