निवडणुकांचे बुधवारी वाजले अखेर बिगुल.- वाचा मतदानाच्या तारखा…
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.
त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी मतदान होईल. तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात पुण्यात दोन मतदारसंघासाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
पाच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभेसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. तिन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी 60 जागांसाठी मतदान होणार आहे.तीनही राज्याच्या विधानसभेची मुदत मार्च संपत आहे. या राज्यात आम्ही हिंसाचार मुक्त निवडणुका कटीबद्ध आहोत. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. आम्ही नुकताच या तीनही राज्याचा दौरा केला आहे. या तीनही राज्यात ६२.८ लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत, असे राजीव कुमार यांनी सांगितले.
मेघालय विधानसभेत एकूण जागा ६० जागांसाठी निवडणूक होणार आहे.
२०१८ ची स्थिती
भाजपः-२
कॉंग्रेसः-२१
एनसीपीः-०१
एनपीइपीः-१९
अर्ज दाखल करण्याची तारीख :-३१ जानेवारी.
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीखः-७ फेब्रुवारी.
अर्ज छाननी ८ फेब्रुवारीला होणार
अर्ज परत घेण्याची तारीखः-१० फेब्रुवारी
मतदानाची तारीखः-२७ फेब्रुवारी
निकालाची घोषणाः-२ मार्च
नागालॅंडमध्ये होणार एकूण ६० जागांसाठी मतदान…
२०१८ ची स्थिती
भाजपः-१२
कॉंग्रेसः-००
एनपीएफः-२६
एनडीपीपीः-१७
अर्ज दाखल करण्याची तारीखः-३१ जानेवारी
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीखः-७ फेब्रुवारी.
अर्ज छाननी ८ फेब्रुवारीला होणार
अर्ज परत घेण्याची तारीखः- १० फेब्रुवारी
मतदानाची तारीखः-२७ फेब्रुवारी
निकालाची घोषणाः-२ मार्च
त्रिपुरामध्ये एकूण ६० जागांसाठी निवडणूक..
२०१८ ची स्थिती
भाजप:- ३५
कॉग्रेसः-००
सीपीएमः-१६
आईपीएफटीः-८
२१ जानेवारीला अधिसूचना निघणार
अर्ज दाखल करण्याची तारीखः- २१ जानेवारी
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीखः ३० जानेवारी.
अर्जाची छाननीः- ३१ जानेवारी
उमेदवारी अर्ज परत घेण्याची तारीखः- २ फेब्रुवारी मतदानाची तारीखः-१६ फेब्रुवारी
निकालाची घोषणाः-२ मार्च