Homeकोंकण - ठाणेदिलासादायक बातमी !येत्या पाच दिवसात नागरिकांना थंडीपासून मिळणार…….पण. पावसाची शक्यतादेखील हवामान विभागाने...

दिलासादायक बातमी !येत्या पाच दिवसात नागरिकांना थंडीपासून मिळणार…….पण. पावसाची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

दिलासादायक बातमी !
येत्या पाच दिवसात नागरिकांना थंडीपासून मिळणार…….पण. पावसाची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

नवी दिल्ली : – वृत्तसंस्था

मागील काही दिवसांपासून देशात हुडहुडी भरली असून खास करून उत्तर भारतात कडक थंडी आहे. अशातच उत्तर भारतीयांसाठी एक महत्वाची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
येत्या पाच दिवसात उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र, याच काळात अनेक भागात पावसाची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार,
२१जानेवारी २०२३पर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मात्र, २२ जानेवारी२०२३नंतर येथील हवामानात बदल होईल.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे
२३ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
२० ते २२ जानेवारी २०२३ पर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशात हवामान कोरडे राहिल.
दुसरीकडे, २३ जानेवारी २०२३रोजी राज्याच्या काही भागात
गडगडाटासह पाऊस पडू शकतो.
दुसरीकडे २४ आणि २५ जानेवारी २०२३ रोजी राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच पश्चिम हिमालयीन प्रदेशात २१जानेवारी २०२३च्या पहाटे पाऊस किंवा बर्फ सुरु होण्याची शक्यता आहे.
तर २४ जानेवारी२०२३ पासून जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
त्यामुळे लोकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळणार आहे.
येत्या २४ तासात त्यात कोणताही बदल दिसणार नाही.
सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स हळूहळू पुढे सरकत आहे.
त्यामुळे २३ ते २६ जानेवारी २०२३ दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
२३आणि २४ जानेवारी २०२३ रोजी पश्चिम हिमालयीन भागात गारपिटीचीही शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.