बेलेवाडी हुबळगी येथे व्यायाम शाळेचे भूमिपूजन. – लवकरच व्यायामशाळा जनतेच्या सेवेत.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा बेलेवाडी हुबळगी येथे खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या राज्यसभा खासदार फंडातून मंजूर व्यायाम शाळेचे भूमिपूजन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय सहायक प्रकाश बेलवाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे संचालक रविंद्र घोरपडे, बेलेवाडी गावचे सरपंच पांडुरंग कांबळे, उपसरपंच मेघा तोरस्कर,गर्जना प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिगंबर मिसाळ, सचिव संतोष बेलवाडे, ग्रामपंचायत सदस्य महादेव रामाणे, मीनाक्षी सुतार,जोतिबा नादवडेकर, विठ्ठल मुदालकर, विनायक शिंत्रे, दत्ता कुंभार, संदीप मिसाळ ,विशाल कांबळे,चंद्रकांत शिलवंत,अर्जुन कुदळे,संतोष सुतार, शिवाजी रामाणे, सुखदेव कांबळे, उमेश बिल्ले ,एकनाथ कुडवे, राहुल शिंत्रे, सचिन रामाणे, प्रवीण लोकरे, आणि इतर मान्यवर तसेच ग्रामस्थ युवक उपस्थित होते. लवकरच ही व्यायामशाळा जनतेच्या सेवेत रुजू होईल. गर्जना प्रतिष्ठान च्या माध्यमातून या गावातील चोरगे विद्यालयात सहा स्वच्छतागृह सुद्धा बांधून देण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले.
