HomeUncategorizedसोलापुरातील सर्व ताडी दुकाने बंद करण्यासाठी आता आरपारची लढाई. - विष्णू कारमपुरी...

सोलापुरातील सर्व ताडी दुकाने बंद करण्यासाठी आता आरपारची लढाई. – विष्णू कारमपुरी ( महाराज )

सोलापुरातील सर्व ताडी दुकाने बंद करण्यासाठी आता आरपारची लढाई. – विष्णू कारमपुरी ( महाराज )

सोलापूर. – प्रतिनिधी.

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सोलापुरातील सर्व शासनमान्य आणि दुकाने बंद करण्यात यावे अशी मागणी करून २४ तास झाले नाही त्यातच अशोक चौक येथील शासनमान्य ताडी दुकानात त्याच दुकानातील ताडी पिऊन एका गरीब यंत्रमाग कामगार साईबाबा म्हेत्रे याचा मृत्यू झाला आहे. म्हणून आता शासनमान्यताडी दुकानाच्या विरोधात आरपारची लढाई करणार असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज )यांनी दिला आहे.
दि. १८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी एक वाजता मा जिल्हाधिकारी यांना शासनमान्यताडी दुकाने बंद करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आणि कालच सायंकाळी सहाच्या सुमारास अशोक चौक येथील शासनमान्य ताडी दुकानात एक व्यक्ती ताडी पिऊन मृत झाल्याचे बातमी आली हा बातमी समजताच तात्काळ विष्णू कारमपुरी महाराज यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्या ठिकाणी खरोखरच मृत पावलेला होता याची खबर मा पोलीस आयुक्त राजेंद्र माने साहेब ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोड, हवालदार अशोक चौक पोलीस चौकी ,यांना कळविण्यात आले काही वेळातच पोलिसांची कुमक त्या घटनास्थळी दाखल झाली त्यावेळी महाराज यांनी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ते परिसरातील नागरिक मृत व्यक्तीचे नातेवाईक असा एकच गर्दी जमली आणि प्रत्येकाने ताडी दुकाने बंद झालेच पाहिजे असे जोरजोराने पोलिसांची वाद घालू लागले शेवटी सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणून पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मोगल साहेब व अशोक चौथीचे श्री बाजूला साहेब व गुन्हे शाखेचे श्री शेख साहेब पोलीस कर्मचारी येणारे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्ही सदर ताडी दुकाने बंद करण्याबाबत शिफारस करू व संबंधितावर*कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतरच मरण पावलेल्या मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विष्णू कारमपुरी (महाराज )यांनी म्हणाले की जोपर्यंत सोलापुरातील शासन मान्य दुकाने बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आत्ता लढाई आरपारची लढाई करणार असा इशारा प्रशासनास आणि ताडी गुत्तेदारांना दिल्या आहे.
याप्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज) दीपक गवळी, गुरुनाथ कोळी, व्यंकटेश पडाल सर, रवि गोणे ,विठ्ठल कुराडकर ,सुरेश शिंदे, आणि मृत व्यक्तीचे नातेवाईक व त्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.