दूषित पाण्याची घेतली आजरा नगरपंचायतने घेतली दखल. – पाणीपुरवठा हिरण्यकेसी ऐवजी चित्रीतून.
आजरा. -प्रतिनिधी.

मागील दोन-तीन दिवसापासून हिरण्यकेशी नदी पात्रातून आजरा तालुक्यातील आजरा नगरपंचायत सह काही गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. परंतु याबाबत पाणीपुरवठा विभागाला आजरा नगरपंचायतला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पारेवाडी यांनी निवेदन दिले असता दूषित पाणीपुरवठा बंद करून आजपासून चित्री येथून पाणीपुरवठा केला जाईल याबाबतच्या सूचना पाणीपुरवठा विभागांना नगरपंचायतने दिल्या आहेत. परंतु संकेश्वर – बांदा होत असलेला महामार्ग या महामार्गामध्ये येणाऱ्या आजरा शहरा नजीक असलेल्या व्हिक्टोरिया पुलाला शंभरहून अधिक वर्ष होऊन गेले आहेत. धोकादायक फुल असल्याची खबरदारी घेत पर्यायी पुलाचा मार्ग करण्यासाठी हिरण्यकेशी नदीतील पाणी अडवून मार्ग करत असल्यामुळे हिरण्यकेशी नदीतील पाणी दूषित झाले आहे. आजरा शहरात जुन्या पाणी कनेक्शन धारकांना दूषित पाणी पुरवठा. गेल्या दोन तीन दिवसापासून आजरा शहरामध्ये हिरण्याकेशी पात्रातून जो पाणी पुरवठा केला जातो. त्या पाणी कनेक्शन धारकांना दूषित व गढूळ पाणी पुरवठा होत असल्याबद्दल नागरिकांतून तसेच महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. आजरा शहरात चित्री प्रकल्प येथून नवीन पाणी पुरवठा केला जात आहे ते पाणी शुद्ध व चांगले आहे. परंतु पूर्वीपासून जे व्हिकटो्रिया पुलाजवळील हिरण्याकेशी नदीतून जे पाणी पुरवले जाते ते पाणी दूषित व गढूळ आहे. संपूर्ण शहराचे सांडपाणी या नदीला येऊन मिसळत असल्यामुळे या पाण्याच्या शुद्धतेबाबत वेळोवेळी शंका उपस्थित होताना दिसते त्यामुळे नवीन पाईप लाईन द्वारे चित्री प्रकल्पमधून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांतुन होताना दिसत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी आजरा शहरातील नागरिकांना शुद्ध जल पुरवठा व्हावा. अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत होती. हिरण्केसी नदीतील पाणी अडवल्यामुळे दूषित होणार आहे याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाला दिली असती तर पाणीपुरवठा विभाग आजरा तालुका यांनी याबाबत पर्याय शोधायला हवा होता. परंतु तसे न होता या नदीतील गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांच्या आरोग्याला होत आहे. याकडे यापूर्वी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे होते.
परंतु हा प्रश्न चित्री धरणातील पाणी पिण्यासाठी व्यवस्था केल्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
