ससूनमध्ये अत्याधुनिक रोबोटिक, लेझर आणि बॅरियाट्रिक सर्जरीची सोय कराच; पण सामान्यांना पायाभूत सुविधा द्या. – नवे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे मनसे नेते जयराज लांडगे यांची मागणी
ससूनमध्ये अत्याधुनिक रोबोटिक, लेझर आणि बॅरियाट्रिक सर्जरीची सोय कराच; पण सामान्यांना पायाभूत सुविधा द्या. – नवे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे मनसे नेते जयराज लांडगे यांची मागणी
पुणे : – प्रतिनिधी.
ससून सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टर संजीव ठाकूर नवे अधिष्ठाता म्हणून रूजू झाले आहेत. यांचा अनुभव आणि काम उत्तम आहे. पदभार स्वीकारतात त्यांनी लेझर, बॅरियाट्रिक आणि रोबोटिक सर्जरी मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या नवीन उपक्रमाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागतच करीत आहे. मात्र ससून रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्या प्राधान्याने देणे गरजेचे आहे. रुग्णालयात रुग्णांची सर्व पुर्वाश्रमीची माहिती ऑनलाईन करणारी यंत्रणा बंद आहे. शिवाय एमआरआयसाठी तीन हजार रुपयांची फी घेतली जात आहे. एमआरआय मोफत दिला जावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित संघटनेचे सरचिटणीस जयराज लांडगे यांनी केले आहे. जयराज लांडगे म्हणाले, ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून गरीब रुग्ण येतात. या रुग्णांना रुग्णांमध्ये आर्थिक खर्च करण्याची क्षमता अत्यंत कमी असते, हे रुग्ण कसेबसे गावातून रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या खिशातील पैसे संपून जातात. अशा अवस्थेत त्यांना पुण्यात ससून रुग्णालयात आल्यानंतर कोणत्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करणे हे योग्य होणार नाही. हे सरकारी रुग्णालय आहे, तिथे मोफत उपचार मिळतात, अशा धारणेने हे लोक येत असतात. त्यामुळे एमआरआयसारख्या गोष्टींसाठी तीन हजार रुपयांची फी भरण्याची क्षमता या लोकांमध्ये असत नाही, शिवाय सर्व रुग्णांची पुर्वाश्रमीची माहिती ऑनलाईन करणारी यंत्रणा सध्या बंद आहे. त्याचा परिणाम म्हणून रुग्णांना वेळेत आणि वेगाने उपचार मिळत नाहीत, ही ऑनलाईन माहिती देणारी यंत्रणा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी जयराज लांडगे यांनी अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याकडे केली आहे.