Homeकोंकण - ठाणेआजऱ्याजवळ व्हेल माशाची २ कोटींची उलटी जप्त. ६ जणांवर गुन्हा.

आजऱ्याजवळ व्हेल माशाची २ कोटींची उलटी जप्त. ६ जणांवर गुन्हा.

आजऱ्याजवळ व्हेल माशाची २ कोटींची उलटी जप्त. ६ जणांवर गुन्हा.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील घाटकरवाडी जवळ आजरा पोलीसांनी २ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे.
गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोव्यातून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून सहा.पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांना मिळाली त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. हारुगडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, विशाल कांबळे, अजित हट्टी, भाग्यश्री चौगुले, वनाधिकारी स्मिता डाके, वनपाल बाळेश न्हावी यांची टिम खासगी वाहनातून आंबोली मार्गावर रवाना झाली. सायंकाळी ५ च्या सुमारास घाटकरवाडी जवळ दोन चारचाकी भरधाव वेगाने येताना दिसली.पोलीसांना संशय आल्याने त्या गाड्यांना रोखले. पथकातील पोलीसांनी गाड्यांना गराडा घातला. सपोनि श्री हारुगडे यांनी चौकशी केली असता सुरुवातीला त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली मात्र पोलीस खाक्या दाखवत चौकशी केली असता आपल्याकडे व्हेल माशाची उलटी असल्याचे कबूल केले. जीए ११ ए ४६३१ व बलेनो एमएच ०७ एजी २४६७ या गाड्यांमध्ये ६ जण बसलेले होते.त्यांच्या कडून प्लास्टिक पिशवी मध्ये असणारी दोन किलोची उलटी पोलीसांनी जप्त केली.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत २ कोटी रुपये आहे. गाडीतील सर्व संशयीत गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.