बेलेवाडी हुबळगी येथे हरिनाम सप्ताह होणार साजरा. – ६६ वर्षाची परंपरा कायम.
आजरा. – प्रतिनिधी.
६६ वर्षाची परंपरा लाभलेला अखंड पंचकृषित नावाजलेला बेलेवाडी हुबळगी गावचा अखंड हरिनाम सप्ताह गावातील विठ्ठल मंदिरात दि१२ जानेवारी ते १९ जानेवारी अखेर संपन्न होत आहे.
बुधवार दिनांक १८ जानेवारी ला सदर हरिनाम सपत्याचा जागर असून गुरुवार १९ जानेवारी सकाळी महाप्रसाद वाटपाचे आजयोजन करण्यात आले आहे. तरी पंचकृषितील भाविकांनि महाप्रसादाचा लाभ घ्यावा
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी अध्यक्ष – अंकुश हातकर, उपाध्यक्ष – भिकाजी तोरस्कर, ह.भ. प. तुकाराम महाराज माळवेकर, ह.भ. प. मधुकर बिल्ले यांनी मोलाचे योगदान दिले.
या हरिनाम सप्ताह साठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.
