आजरा तालुक्यातील पेद्रेवाडीत पहाटे टस्कर हत्तीची दहशत..- शाळेच्या स्कूल बसची मोडतोड.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी येथील कै.केदारी रेडेकर हायस्कूल येथे हा प्रकार घडला आहे. शनिवार दि. १४ रोजी पहाटेच्या सुमारास टस्कर हत्तीने शाळेच्या आवारात उभी असलेली स्कूलबस सुमारे १५ फुट फरफटत जाईल असा जोरदार धक्का दिला आहे. हा धक्का फक्त स्कूल बसला नसून वन विभागाला देखील आहे. गाडीच्या सगळ्या काचा फोडत बाहेरील बॉडीचेही नुकसान केले आहे. शाळेच्या फलकाची मोडतोड करत शाळेजवळील दोन नारळाची झाडेही पाडली आहेत. यापूर्वीही देखील या टस्कर हत्तीने या गावात धुमाकूळ घातला होता. हत्तीच्या वाढत्या उपद्रवाला व बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग अपयशी ठरल्याचे बोलले जाते.