HomeUncategorizedआजरा शहरात मोबाईल चोरीचे वाढते प्रमाण. - नागरिकांनी खबरदारी घ्यावी. - मोबाईल...

आजरा शहरात मोबाईल चोरीचे वाढते प्रमाण. – नागरिकांनी खबरदारी घ्यावी. – मोबाईल दुकानदारांचे आवाहन. – तीन शुक्रवार आठवडा बाजारात अंदाजे नऊ मोबाईल चोरीला.

आजरा शहरात मोबाईल चोरीचे वाढते प्रमाण. – नागरिकांनी खबरदारी घ्यावी. – मोबाईल दुकानदारांचे आवाहन. – तीन शुक्रवार आठवडा बाजारात अंदाजे नऊ मोबाईल चोरीला.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरात शुक्रवार बाजार व गर्दीच्या संधीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे यासाठी नागरिकांनी खबरदारी म्हणून आपला मोबाईल सुरक्षित ठेवावा व वेळोवेळी लक्ष द्यावे असे आवाहन काही मोबाईल दुकानदार यांनी केले आहे.
यासाठी प्रथम आपल्या मोबाईल चोरी झाल्यानंतर सदर मोबाईलचे बिल घेऊन पोलीस स्टेशन येथे मदत घ्यावी. यासाठी आपण मोबाईल खरेदी करत असताना दुकानदार यांनी दिलेले बिल आपल्या घरी सांभाळून ठेवावे अन्यथा आपला मोबाईल विकत घेतला आहे. असं ग्राह्य धरले जाणार नाही. मागील दोन-तीन आठवड्यामध्ये प्रत्येक शुक्रवार रोजी किमान तीन-चार मोबाईल चोरी गेली चर्चा आवाजात आहे. यामधील काही मोबाईल धारकाने पोलीस स्टेशन कडे धाव घेतली असल्याचे समजते. परंतु ज्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे. त्यांनी लागलीच पोलीस स्टेशनची मदत नाही. घेतल्यास या मोबाईल चोरी करणाऱ्या चोराचा फैलाव वाढेल यासाठी आपली मोबाईल चोरी झालेली तक्रार बिलासह पोलीस स्टेशनला द्यावी. मागील तीन शुक्रवार आठवडा बाजारात नऊ मोबाईल चोरीला गेले आहेत. असे समजते परंतु मागील एक महिन्यापासून हा मोबाईल चोरटा बाजारात फिरत असल्याचे लक्षात येत आहे यापूर्वी असे शुक्रवार आठवडा बाजार दिवशी मोबाईल चोरी होत नव्हते किंवा अन्य चोरी काही फारशी होत नव्हती बस स्थानक वगळता अशा चोऱ्या आजरा बाजारपेठेत होत नव्हत्या परंतु हा नवा चोर कोण आहे हा पकडला पाहिजेत यासाठी नागरिकांनी आपला मोबाईल जपून ठेवून सादर करावे असेही व्यापारी अवाहन करत आहेत.दि.१३ रोजी शुक्रवार आठवडा बाजार ३ मोबाईल चोरी गेले असल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.