आजरा. – प्रतिनिधी.
आजरा साखर कारखान्यास बोगस चेक देणाऱ्यास शिक्षा झाली असून अलिकडे ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारामार्फत फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.
आजरा साखर कारखान्यात ऊस तोडणी वाहतूक ऍडव्हान्स रकमेच्या थकबाकी फेडीपोटी शिवाजी तुकाराम महाजन रा. निळपन. ता.भुदरगड यांनी रक्कम रु. ४,८८,०० इतक्या रकमेचा चेक दिला होता सदस्य चेक न वाटल्याने त्यांचे विरोध प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आजरा येथे दाखल केली होती त्यावर न्यायमूर्ती सो यांनी आरोपी महाजन यास ६ महिने कैदेची शिक्षा व रुपये १००० दंड व दंड न भरलेस पुन्हा तीन महिने शिक्षा असा निकाल दिला आहे त्याचप्रमाणे रु ४,८८,०० इतकी नुकसान भरपाई कारखाना देण्याचा निकाल दिला आहे. फिर्यादी कारखान्याच्या वतीने वकील म्हणून एडवोकेट बी.के. देसाई यांनी काम पाहिले होते.
सध्या महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांमध्ये तोडणी वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऍडव्हान्स रकमा उचल करून साखर कारखान्यात फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. अशी फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाकडून देखील वेगवेगळे पर्याय अवलंबले जात आहेत महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारामार्फत फसणुकीचे प्रमाण वाढले आहे. अशातच आजरा साखर कारखान्याने दाखल केलेल्या दाव्यामध्ये सर्व बाजूंचा विचार करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आजरा यांनी दिलेल्या निर्णय असून कंत्राटदारावर वचक बसणे करिता महाराष्ट्रातील सर्व कारखानदारांना मार्गदर्शकच ठरणार आहे. या निर्णयाला मदत होणार आहे असे आजरा सहकारी साखर कारखाना यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
