Homeकोंकण - ठाणेकोल्हापूरची स्वाभिमानी जनता. नेते हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी. - आजरा ता. महाविकास...

कोल्हापूरची स्वाभिमानी जनता. नेते हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी. – आजरा ता. महाविकास आघाडी.( आजरा महाविकास आघाडीने केला सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा निषेध. )

कोल्हापूरची स्वाभिमानी जनता. नेते हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी. – आजरा ता. महाविकास आघाडी.
( आजरा महाविकास आघाडीने केला सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा निषेध. )

आजरा. – प्रतिनिधी.

कोल्हापूरची स्वाभिमानी जनता नेते हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी असेल कितीही सूडबुद्धीने कारवाई केलात तरीही गोरगरीब जनता हि आम. श्री. मुश्रीफ यांच्यासोबतच असेल या ईडी कारवाई घटनेचा निषेध करत असल्याचे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे नेते माजी मंत्री आम. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई हि निषेधार्थ असून केवळ सूडबुद्धीने हि कारवाई केली आहे. यामध्ये पाठीशी घालणारे किरिट सोमय्या व कागल भाजपचे नेते यांचा व भाजप सरकारचा आजरा ता. महाविकास आघाडी या घटनेचा निषेध करत आहे.
हि कारवाई म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचे षडयंत्र भाजपकडून आपली पुढील राजकीय विकासाचे दिसत असल्याने ईडी सारख्या कारवाया पुन्हा पुन्हा येत आहे. या चाललेल्या कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमान जनता येणाऱ्या काळातील जागा दाखवून देईल व जनतेचे नेते असून असंख्य जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. आम्ही सर्व महाविकास आघाडी आजरा तालुका जाहीर निषेध करत आहोत. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकावर मुकुंददादा देसाई, सुधीर देसाई, वसंतराव धुरे, अल्बर्ट डिसोझा, संभाजी पाटील, विष्णुपंत केसरकर, उमेश आपटे, शिरिष देसाई, काशिनाथ तेली, किरण अमनगी, महेश करबळी, युवराज पोवार, राजेंद्र सावंत, अनिकेत कवळेकर, ओंकार माद्याळकर, नौशाद बुडृडेखान, सह महाविकास आघाडी पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.