शत्रूला अंगावर घेणाऱ्या विनोद मोहिते सारख्या सैनिकांची देशाला समाजाला गरज. –
प्रा.अर्जुन अबिटकर, पेरणोलीत मोहिते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मिरवणूकिने सत्कार.
आजरा : – प्रतिनिधी.

देशाच्या रक्षणात भारतीय जवानांचे योगदान मोठे आहे. प्रसंगी शत्रूला अंगावर घेऊन मायभूमीचे रक्षण करणाऱ्या विनोद मोहितेसारख्या सैनिकांची समाजाला व देशाला गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन अबिटकर यांनी केले. पेरणोली ता आजरा येथे भारतीय स्थल सेनेतील हावलदार विनोद केशव मोहिते यांचा २० वर्षाच्या प्रदीर्घ सेवानिवृत्तनिमित्त सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते प्रमूख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच उषाताई जाधव होत्या. प्राचार्य अबिटकर म्हणाले जवान मोहिते यांनी ऊन, वारा, पाऊस आणि रक्त गोठवणारी थंडीच्या वातावरणात लागेल त्या ठिकाणी सेवा केली आहे.मिळेल त्या ठिकाणी लहरी निसर्गाबरोबर शत्रूच्या अंगावर जाऊन करारा जवाब देत माय भूमीचे रक्षण केले.आपल्या कुटुंबात परतताना या अभूतपूर्व क्षणाचे आम्ही सर्वसण साक्षीदार बनतोय यातच आम्ही धन्य मानतो. सरपंच जाधव म्हणाल्या,जवान मोहिते भारत मातेच्या सेवेनंतर मातृभूमी कडे आले आहेत.

यापुढील कार्यकाळात गावच्या विकासासाठी सुद्धा योगदानासाठी त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. यावेळी माजी सभापती उदयराज पोवार,उपसरपंच उत्तम देसाई,पत्नी विद्या मोहिते, गडहिंग्लज माजी नगरसेविका क्रांतीताई शिवणे,आजरा तालूका सैनिक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय मोहिते, गोविंद जाधव,ऊदय कोडक यांची भाषणे झाली यावेळी काढण्यात आलेल्याभव्य मिरवणुकीत मराठी शाळेच्या मुलांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. यावेळी धनगरी नृत्य, हलगीवादन, बँजो, डिजेमाध्यमातून संपूर्ण गावात जल्लोषी वातावरणात मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी आजरा तालुका आजी – माजी सैनिक संघटना, माजी हावलदार दिनकर जाधव, सुभेदार सर्जेराव जाधव, कँप्टन गोविंद केरकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप नावलकर, उज्वला मस्कर, प्रियांका जाधव, नंदा कांबळे, बाबासाहेब लोखंडे, अरूण जाधव, काका देसाई, प्रकाश मोहिते, किरण गुरव, अविनाश जोशिलकर, रामचंद्र. हळवणकर, दिपक लोखंडे, सुरज मुजावर, कृष्णा सासूलकर पेरणोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तानाजी देसाई यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनीकेले. संजय मोहिते यांनी आभार मानले.
