HomeUncategorizedमाजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु...

माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली

माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली

कोल्हापूर. – प्रतिनिधी.


कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर
सकाळी 6 वाजल्यापासून श्री मुश्रीफ यांच्या पासून ईडीकडून (ED) छापेमारी सुरु करण्यात आली आहे. छापेमारी होत असल्याची मुश्रीफ माहिती समजते याबाबत लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सध्य मुश्रीफ घरी नसल्याची माहिती आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरू केली होती. सातत्याने त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. सोमय्या यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट दिली होती. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आपासाहेब नलवडे कारखान्यामधील झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हे प्रकरण आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावरून आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आपला काही संबंध नाही असं म्हटलं होतं.

माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला काही समजण्या अगोदरच अधिकाऱ्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला आणि छाप्यास सुरुवात केली. बंगल्याच्या चारी बाजूने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी बंदोबस्त झालेले सर्व पोलीस दिल्ली पोलिस दलातील आहेत.

यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी

जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागानं केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागानं छापा टाकला होता.

कागल बंद …कागल बंद… कागल बंद

आपल्या जिल्ह्याचे दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीचा छापा आज पहाटे पडला असून त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार याचा निषेध करण्यासाठी कागल बंद करण्याचा आवाहन आम्ही करत आहोत.
घरामध्ये एके 47 रायफली तैनात केलेले पोलिस लावून अशा पद्धतीचे दहशत माजवून एका चांगल्या काम करणाऱ्या नेत्याच्या घरावर असा मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने घातलेले हे ईडीचे छापे त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी कागलच्या व्यापाऱ्यांना उद्योजकांना सर्वांना आम्ही आवाहन करतो की आजच्या दिवशी कागल कडकडीत बंद पाळण्यात यावा.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कागल शहर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.