आजरा शहरात जनता
कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद.- आजरा बाजार पेठ आठ दिवस बंद.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा शहरात आठ दिवसाचा लाॅकडाऊन करण्यात आला आहे
आज मंगळवार दि. ४ पासून सुरुवात झाली आहे. या जनता कर्फ्यूओचा पहिला दिवस असुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.
फक्त अत्यावश्यक सेवा सुरु रहाणार असलेने ग्रामीण भागातील नागरिक आजरा शहराकडे फिरकले नसल्याने आजरा शहरातील रस्ते बाजारपेठत शुकशुकाट होता. आजरा नगरपंचायत प्रशासनाने कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव व शासन बंद काळात सकाळी ७ ते ११ या वेळेत बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत असल्याने जनता कर्फ्यूओचा निर्णय घेतला होता. या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजरा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्त होता.
