Homeकोंकण - ठाणेखासदार संजय मंडलीक गटाला धक्का. विरेंद्र मंडलीक पराभूत.

खासदार संजय मंडलीक गटाला धक्का. विरेंद्र मंडलीक पराभूत.

खासदार संजय मंडलीक गटाला धक्का. विरेंद्र मंडलीक पराभूत.

कोल्हापूर. प्रतिनिधी.

तर विरोधी गटाचे १७ उमेदवार निवडून आले.तर सत्ताधारी गटाते ४ उमेदवार निवडुन आले.

-खासदार संजय मंडलीक यांचा मुलगा विरेंद्र मंडलीक व राजेश पाटील यांची पत्नी आणि वीरेंद्र मंडलीक यांची आत्या यांना गोकुळमध्ये पराभवाला सामोरे जावं लागले आहे. दरम्यान विरोधी गटाचे १७ उमेदवार निवडून आले. तर सत्ताधारी गटाते ४ उमेदवार निवडुन आले. मागच्या कित्येक वर्षांपासून महाडिक गटाची सत्ता होती. सत्तांतरण करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी सत्ता मिळवली आहे.गोकुळमध्ये परिवर्तन होणार याबाबत जोरदार चर्चा रंगली होती.

गोकुळला मल्टिस्टेट करण्यावरून मागच्या दोन वर्षांपासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच लढाई सुरू होती. विरोधी गटाचे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळला मल्टिस्टेट होऊ न देण्याचा चंग बांधला होता. यावरून जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली होती. याचाच फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याचे दिसून आले.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :

राजर्षी शाहू शेतकरी आघाडी (विरोधी गट) – सर्वसाधारण गट – अरूण डोंगळे – 1980, अभिजित तायशेटे – 1972, अजित नरके – 1972, नविद मुश्रीफ – 1959, शशिकांत पाटील-चुयेकर – 1923, विश्‍वास पाटील – 1912, किसन चौगले – 1889, रणजित कृष्णराव पाटील – 1872, नंदकुमार ढेंगे – 1867, कर्णसिंह गायकवाड – 1848, बाबासाहेब चौगले – 1814, प्रकाश पाटील – 1709, संभाजी पाटील – 1721, महिला गट – अंजना रेडेकर – 1872, भटक्‍या विमुक्त जाती-जमाती – बयाजी शेळके, इतर मागासवर्गीय – अमर पाटील, अनुसुचित जाती- डॉ. सुजित मिणचेकर. राजर्षी शाहू आघाडी (सत्ताधारी गट) – अंबरिशसिंह घाटगे – 1803, बाळासाहेब खाडे – 1715, चेतन नरके – 1762, शौमिका महाडिक – 1769.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.