Homeकोंकण - ठाणेआजरा - बलात्कार प्रकरणी आरोपीला जन्मठेप.- पीडित महिलेला ६० हजारांची नुकसानभरपाई.

आजरा – बलात्कार प्रकरणी आरोपीला जन्मठेप.- पीडित महिलेला ६० हजारांची नुकसानभरपाई.

आजरा – बलात्कार प्रकरणी आरोपीला जन्मठेप.- पीडित महिलेला ६० हजारांची नुकसानभरपाई.


आजरा : प्रतिनिधी.

आजरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणात गडहिंग्लज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. याशिवाय अपंग व्यक्तींच्या हक्कानुसार पाच वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावास, अशीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडित महिलेला ६० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सदर प्रकरणातील आरोपी संतोष तुकाराम रेडेकर (वय ४७, रा. हरूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६७/२०२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, पीडित महिला मतिमंद असून दिवाळी सणासाठी नातेवाइकांकडे हरूर येथे गेली होती. यावेळी आरोपीने पीडितेला खाऊ देण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी केला. पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप मसेकर यांनी तपासात महत्त्वाची कामगिरी बजावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा न्यायालयात सरकारी वकील अॅड. सुनील तेली यांनी युक्तिवाद केला. केस ऑफिसर म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जयश्री कांबळे यांनी काम पाहिले.
या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाला असून आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.