Homeकोंकण - ठाणेआजरा साखर कारखान्यात उत्पादित साखर पोत्यांचे पूजन कार्यक्रम संपन्न.

आजरा साखर कारखान्यात उत्पादित साखर पोत्यांचे पूजन कार्यक्रम संपन्न.

आजरा साखर कारखान्यात उत्पादित साखर पोत्यांचे पूजन कार्यक्रम संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्यात चालू गळीत हंगाम 2022-23 मध्ये उत्पादीत झालेल्या 55555 साखर पोत्यांचे पुजन कारखान्याचे मा.संचालक श्री आनंदा सखाराम कांबळे यांच्या शुभहस्ते व मा. चेअरमन श्री सुनिल अर्जुन शिंत्रेसाहेब व मा. संचालक मंडळ सदस्य यांचे उपस्थित आज 22/11/2022 रोजी संपन्न झाला.

आजरा साखर कारखान्यात या गळीत हंगामात 23 दिवसांत 68750 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 64650 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असुन सरासरी 9.60 टक्के इतका साखर उतारा प्राप्त झालेला आहे. यावेळी कारखाना चेअरमन श्री सुनिल अर्जुन शिंत्रे यांनी कारखान्याचे गाळप नियोजना प्रमाणे व्यवस्थित सुरू असून, या गळीत हंगामात किमान 4.5 लाख मे.टन गाळप करणेसाठी योग्य नियोजन संचालक मंडळाने केले आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस वेळेत तोडणीसाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतुक यंत्रणा कारखान्याकडे पुरेशा प्रमाणात कार्यरत आहे. सद्या झालेल्या अती पावसाचा परिणामामुळे ऊसाचे प्रती हेक्टर उत्पादन घटले आहे. असे असतांना देखील कारखान्याने इतर कारखान्यांचे बरोबरीने ऊस गाळप करत असुन त्यांच्याच बरोबरीने प्रति टन रू.3000/- प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम विनाकपात एक रक्कमी ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वेळच्यावेळी पाठविणेचे नियोजन केले आहे. त्यानुसार 15 नोव्हेंबर 2022 अखेर पहिल्या पंधरवडयात आलेल्या ऊसाचे बिल देखील लवकरच ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करणेचे नियोजन केले आहे. तसेच तोडणी वाहतुक यंत्रणेची बिलेही देणेची तरतुद केली आहे. येथुन पुढेही येणा-या ऊसाची बिलेही कोल्हापुर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने वेळेत आदा करणेचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. कारखान्याकडे नोंदविलेला संपुर्ण ऊस आणण्याची जबाबदारीही कारखाना व्यवस्थापनाची आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस आजरा कारखान्यास पुरवठा करून सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

या कार्यक्रमास कारखान्याचे मा. संचालक श्री. मुकुंदराव देसाई, श्री. दिगंबर देसाई, मा. संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. सुनिता रेडेकर मा. संचालक श्री मारूती घोरपडे, श्री मधुकर देसाई, श्री. जनार्दन टोपले, श्री. राजेंद्र सावंत, श्री. मलिककुमार बुरूड, तसेच कारखान्याचे मा. कार्यकारी संचालक डॉ. श्री.टी.ए.भोसले. जनरल मैनेजर (टेक्नी) श्री. व्ही. एच. गुजर, सेकेटरी श्री. व्ही. के. ज्योती, मुख्य शेती अधिकारी श्री. एस.एन.व्हरकट, इन.चिफ केमिस्ट. श्री. बी. एम. घोळसे, खातेप्रमुख, कर्मचारी व ठेकेदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.