२०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिनविरोधचा प्रस्ताव मग २०२२ चा का. ? नाही. – ग्रामस्थ संभ्रमावस्थेत. भाग. – ३
संपादकीय. – संभाजी जाधव.
गावच्या हिताच्या दृष्टीने व सर्व गट- तट एकत्र आल्यास गावचा विकास होईल या दृष्टिकोनातून अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात असणारे गट एकत्र येऊन २०१७ ची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव गावासमोर ठेवण्यात आला. परंतु या प्रस्तावाला काही ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे अखेर तिन्ही प्रभागातील तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातील एक असे तीन उमेदवार व सरपंच पदासाठी अखेर निवडणूक लागली होती.

निवडणुकीला उभारणे हा लोकशाहीचा भाग असला तरी होऊ घातलेल्या निवडणुकीत किमान प्रस्ताव तरी मांडण्यात आला होता. तो प्रस्ताव २०२२ च्या निवडणुकीत प्रस्ताव देखील दिसत नाही. गावातील प्रत्येक गटाची आपापल्या वेगवेगळी बैठका लावून काही गटाने वेगळीच चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय कदाचित कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे घेतला असावा सर्व गटप्रमुखांनी गावातील एकोपा राहण्यासाठी निवडणुक बिनविरोध साठी एकत्रित ग्रामसभा का. ? लावली नाही.
असाही प्रश्न काही ग्रामस्थांच्या मनामध्ये उपस्थित होय आहे. व याबाबतच्या चर्चा देखील ग्रामस्थामध्ये होत आहेत. गावच्या हिताच्या दृष्टीने जर गावची निवडणूक बिनविरोध झाली तर एक आदर्श राहील यासाठी सरपंच पदासाठी एकच उमेदवार निवडून ग्रामपंचायत सदस्य आरक्षणाप्रमाणे योग्य व्यक्ती निवडावा व गावची निवडणूक बिनविरोध व्हावी असे काही शिक्षित व स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे.
या गावातील तीन गटातील नेते यामध्ये भावेश्वरी समूहाचे नेतृत्व माजी सभापती भिकाजी गुरव करतात व हनुमान समूहाचे नेतृत्व के. व्ही . येसणे करतात तर लोकमान्य समुहाचे नेतृत्व जनार्धन निऊगरे करतात सद्या या गटातील भावेश्वरी समूह व हनुमान समूह हे राष्ट्रवादी पक्षाचे काम करतात. कागल विधानसभेमध्ये मडिलगे हे गाव येत असल्याने माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे हे दत्तक गाव आहे. तर लोकमान्य समूह हा भाजपचं काम करत आहे.
अशी लढत झाल्यास
जर हनुमान समूह व भावेश्वरी समूह एकमेकांच्या विरोधात चालल्यास राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडतील हे मात्र निश्चित. जरी स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्ष बाजूला ठेवून गटतट म्हणून एकमेकांच्या विरोधात जरी लढत असले तरी येणाऱ्या काळात या गटाची ऐकी झाली तरी यामध्ये काही नवल नाही यापूर्वीही असंच घडूनही पुन्हा नव्याने एकत्र येत गावचा विकास व्हावा. या दृष्टीने माझी मंत्री हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादी म्हणून पाठिंबा दिला होता. मग आत्ताच या निवडणुकीत परस्पर आघाड्या करून एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चा आहेत या कदाचित फक्त चर्चाही असू शकतात. कारण येणाऱ्या काळातील निवडणुकीच्या जोडण्या घालायच्या असतील तर राष्ट्रवादी मधील दोन गटाच्या परस्पर लढती या पक्षालाही घातक ठरू शकतात.
पण अद्याप शिवसेना, मनसे, व अन्य पक्षाची भूमिका या निवडणुकीत स्पष्ट दिसत नाही. एखाद्या आघाडीसोबत हातमिळवणी करतात कि अपक्ष लढतात अजूनही ठरलेले दिसत नाही.
यामुळे २०२२ ची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणुक हि युवा पिढीला संधी देणारी असावी किंवा बिनविरोध यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.