Homeकोंकण - ठाणेग्रामपंचायत रणधुमाळी. - आजरा मडिलगेत होणार तीन आघाड्या. - सरपंच पदासाठी चौरंगी...

ग्रामपंचायत रणधुमाळी. – आजरा मडिलगेत होणार तीन आघाड्या. – सरपंच पदासाठी चौरंगी लढतीची शक्यता. – युवा पिढीला कधी मिळणार संधी. – प्रतिक्षा त्या पंचवार्षिकची. भाग. २

ग्रामपंचायत रणधुमाळी. – आजरा मडिलगेत होणार तीन आघाड्या. – सरपंच पदासाठी चौरंगी लढतीची शक्यता. – युवा पिढीला कधी मिळणार संधी. – प्रतिक्षा त्या पंचवार्षिकची. भाग. २

संपादकीय. – संभाजी जाधव. २१

मागील अनेक वर्षांपासून परस्पर विरोधी असणारे हनुमान समुह व भावेश्वरी समुह मागील पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदासह अन्य काही जागांवर एकत्रित लढले काही उमेदवार बिनविरोध झाले होते. अनेक वर्षाचे प्रतिस्पर्धी असणारे हे गट मागील पंचवार्षिक निवडणुकीत एकत्र आल्याने दोन्ही गटातील मतदार नाराज झाले होते. तो काळ संपला व नियोजित ठरलेप्रमाणे लोकनियुक्त सरपंच असताना अडीच अडीच वर्ष सरपंच पदाचा कालावधी वाटुन घेतला.
माजी उपसभापती दिपक देसाई यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यावर राजीनामा देऊन हनुमान समूहातील ग्रा. पं सदस्य उपसरपंच गणपती आरळगुंडकर यांना सरपंच पदाची संधी दिली होती.
होऊ घातलेल्या सन. २०२२ पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या गटाच्या बैठका घेऊन मतदारांचे मत व उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

निवडणुका जवळ आल्यानंतर सर्व नेते गटातील सदस्य यांची भूमिका व निर्णय महत्त्वाचे समजतात हे काही नविन नाही. नियोजन कार्यक्रम असतो फक्त विचारणा केली जाते. या आता गटात तटाच्या राजकारणाला ग्रहण लागले आहे.

हनुमान समूह , भावेश्वरी समूह व नव्याने उद्यास येत असलेला लोकमान्य समूह हे तीन गट परस्पर विरोधी भूमिका घेतील असे अद्याप तरी वाटत नसले तरी तिन्ही गटाने एकला चलो रे भूमिका घेतली असल्याची सद्या चर्चा आहे.

सरपंच पदासाठी इच्छुकांची यादी जरी मोठी असली तरी ऐनवेळी त्यांना वेगळ्या अमिषाकडे वळवून शांत बसवणे ही एक जुनी कलाच आहे. तर दुसरीकडे काही इच्छुक आपले नशीब पुन्हा एकदा आजमवणार आहेतच.

मडिलगे गाव गटातटाचे विरोधक असले तरीही गावचा विकास करण्यासाठी सर्वच गट एकत्र येऊन अगोदर गावात आलेला निधी व निधीचा विनियोग करून आपल्या गावचा विकास करून घेण्यासाठी नेहमीच एकत्र येतात हे तालुक्यातील बहुतेक नेत्यांना माहिती आहे.

यामुळेच मागील वीस वर्षापासून पंचायत समिती मधील विजयी उमेदवार हा मडिलगे येथील असतो ही एक गावातील एकी वेगळी असली तरी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु येणाऱ्या पंचायत समिती व आजरा साखर कारखान्याच्या निवडणूक येतील राजकारण व उमेदवार हे कोण असतील व ग्रामपंचायत निवडणुकीत जर परस्पर विरोधी भूमिका घेऊन ही गट जत लढले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हीच भूमिका कायम राहील की पुन्हा सत्तेच्या राजकारणासाठी एकत्र येतील याबाबत संभ्रमावस्था निर्माण होणार आहे

ज्यांच्या सोबत युवा पिढी त्यांची मोठी विजयी आघाडी असच एक कल मागील निवडणुकीच्या राजकारणात दिसून आला आहे. खरंतर तरुण पिढीला या निवडणुकीमध्ये संधी देऊन बिनविरोध निवडणूक केली पाहिजे होती असे न होता प्रत्येक गट आपल्या गटाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत आहे परंतु बिनविरोध निवडणूक करण्याची भूमिका अद्याप कोणत्या गटांनी मांडलेली ऐकवण्यात नाही.

युवा पिढीच्या विचाराला या गावात प्रचंड महत्व दिले जाते पण युवा पिढीला पुढे येऊन नेतृत्व करण्याची संधी मात्र मिळत नाही.

अशा काही चर्चेना जरी ऊत आला असला तरी. – कोणता गट कोणाशी हात मिळवणी करून लढेल हे आत्ताच स्पष्ट होणार नाही. पण युवा पिढीला संधी देऊन निवडणूक बिनविरोध करावी अशी अपेक्षा गावातील काही नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.