Homeकोंकण - ठाणेकणकवली येथे जिल्हास्तरीय शालेय फेंसिन्ग स्पर्धा संपन्न्न.

कणकवली येथे जिल्हास्तरीय शालेय फेंसिन्ग स्पर्धा संपन्न्न.

कणकवली येथे जिल्हास्तरीय शालेय फेंसिन्ग स्पर्धा संपन्न्न.


कणकवली/प्रतिनीधी.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग , जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग, आणि सिंधुदुर्ग जिल्हा फेंसिन्ग अससोसिएशन च्या वतीने येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय शालेय फेंसिन्ग ( तलवारबाजी ) स्पर्धा संपन्न्न झाली या स्पर्धेचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवली विश्वस्त अनिलपंत डेगवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.

यावेळी कणकवली कॉलेज चे प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक भारत सरवदे, तलवारबाजी अससोसिएशन चे अध्यक्ष अच्युतराव वणवे, सचिव एकनाथ धनवटे, खजिनदार सुदिन पेडणेकर, क्रीडा शिक्षक संजय सावळ, पंच अंकुर जाधव, प्रा. जयश्री कसालकर, जिस्ना नायर, विनायक वावरे, पालक व खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – 17 वर्षा खालील मुले
फॉईल प्रकार – प्रथम रुद्रेश पडते -सेंट उर्सूला स्कूल, वरवडे, द्वितीय – प्रणव मोर्ये – विद्यामंदिर हायस्कूल कणकवली. तृतीय- गावकर – विद्यामंदिर हायस्कूल, तृतीय -अथर्व तावडे, कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली
इपी प्रकार – रत्नेश जातेकर, बालशिवाजी इंग्लिश स्कूल, कणकवली. द्वितीय – कुणाल नारकर बालशिवाजी इंग्लिश स्कूल, तृतीय – साईराज वावरे – अ. रा. विद्यालय वैभववाडी, यज्ञेश गावकर- विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला.
सेबर प्रकार – प्रथम – कुणाल नारकर – बालशिवाजी इंग्लिश स्कूल, द्वितीय यश तेली – विद्यामंदिर हायस्कूल, तृतीय – महादेव सावंत – कळसुली इंग्लिश स्कूल, प्रणव कुडाळकर – विद्यामंदिर हायस्कूल कणकवली.
17 वर्षाखालील मुली
फॉईल प्रथम – सोनिया ढेकणे – बालशिवाजी इंग्लिश स्कूल, द्वितीय – आर्या परब – विद्यामंदिर हायस्कूल, तृतीय – गौरी गावडे, मानसी खानोलकर – विद्यामंदिर हायस्कूल कणकवली,
प्रथम -ऋतुजा शिरवलकर बालशिवाजी इंग्लिश स्कूल, द्वितीय- मधुरा राणे – विद्यामंदिर हायस्कूल, तृतीय -यशश्री सावंत – विद्यामंदिर हायस्कूल, आर्या परब विद्यामंदिर हायस्कूल कणकवली.
सेबर प्रथम – ऋतुजा शिरवलकर – बालशिवाजी इंग्लिश स्कूल, द्वितीय – यशिका महाडेश्वर- बालशिवाजी इंग्लिश स्कूल, तृतीय – गौरी गावडे – विद्यामंदिर हायस्कूल, सोनिया ढेकणे – बालशिवाजी इंग्लिश स्कूल कणकवली.


19 वर्षाखालील मुले
फॉईल प्रथम- आकाश तावडे – कणकवली ज्यु.कॉलेज, द्वितीय – तन्मय खरात – कळसुली ज्यु. कॉलेज
इपी प्रथम – करण घाडीगावकर – कळसुली ज्यु. कॉलेज
द्वितीय – आर्यन महाडीक – कणकवली ज्यु. कॉलेज.
सेबर प्रथम -अक्षय देसाई – कळसुली ज्यु. कॉलेज.
19 वर्षाखालील मुली
फॉईल प्रथम – सुनामी देसाई – कळसुली ज्यु. कॉलेज, द्वितीय – सायली वाघाटे कणकवली ज्यु. कॉलेज.
प्रथम – प्रीती दळवी – आय. डी. एल. ज्यु. कॉलेज
द्वितीय – लाजरी वातकर – कणकवली ज्यु. कॉलेज, तृतीय -अवंतिका कासले कळसुली ज्यु. कॉलेज, कळसुली
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, विजय शिंदे यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.