Homeकोंकण - ठाणेस्व. राजारामबापू देसाई यांचा शनिवार १९ रोजी स्मृतीदिनविविध कार्यक्रमांचे आयोजन.

स्व. राजारामबापू देसाई यांचा शनिवार १९ रोजी स्मृतीदिनविविध कार्यक्रमांचे आयोजन.

स्व. राजारामबापू देसाई यांचा शनिवार १९ रोजी स्मृतीदिन
विविध कार्यक्रमांचे आयोजन.

आजरा. – प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, आजरा तालुका संघाचे माजी अध्यक्ष व आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक स्व. राजारामबापू देसाई यांचा पंधरावा स्मृतिदिन शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी यांनी दिली.

मलिग्रे व आजरा येथे रक्तदान शिबिर होणार असून फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. माजी ग्रामविकास मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकुंदराव देसाई, गोकुळचे माजी संचालक रवींद्र आपटे, विद्यमान संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष सौ. अस्मिता जाधव,सौ.रचना होलम, कॉ. संपत देसाई, संभाजी पाटील, सुधीर कुंभार, वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, अल्बर्ट डिसोजा, उदयराज पवार, सौ. कामिना पाटील, काशिनाथ तेली जनार्दन टोपले, राजेंद्र गड्ड्याणवर, राजेंद्र सावंत, नागेश चौगुले, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, प्रा. पी. डी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी दुपारी तीन वाजता श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे होणार आहे असे हुक्केरी यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.