कणकवली वागदे पेट्रोल पंपांनजिक भीषण अपघात
दुचाकीस्वार ठार
कणकवली/प्रतिनीधी.
मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे पुणे स्वारगेट कराड मार्गे राजापूर ते गोवा जात असताना दुचाकीला अपघात होऊन अभिषेक संजय देसाई(वय -२२,रा.पुणे) युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला.
अधिक वृत्त असे की, पुण्याहून गोव्याकडे एका कार्यक्रमासाठी ३२ ते ३५ जणांचा बुलेट रॉयल एनफिल्ड कंपनीच्या गाड्यांचा ताफा जात होता. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अभिषेक देसाई (वय २२ रा. पुणे) अस मृत युवकाच नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ५:३० वा. हा अपघात घडला. गाडी क्रमांक एम. एच. १२ टी. एम. ८७०३ घेऊन तो गोव्याच्या दिशेने चालला होता. वागदे येथे आला असता पेट्रोल पंपानजीकच्या वळणावर रस्त्याच्या बाजूच्या दुभाजकावर मोटारसायकल आदळली व डोक्याला मार लागल्याने दुदैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, दीपक मेस्त्री होमगार्ड, नितेश गुरव, सिद्धेश पाटील, हायवे ट्राफिकचे देवानंद मिटबावकर घटनास्थळी दाखल झाले होते. अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सूरु होते.