उसाच्या मोळी रस्त्यावर – ट्रॅक्टर चालक कारखान्यावर. – रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ट्रॅक्टर मधून उसाच्या मोळी रस्त्यावरच.
आजरा. – प्रतिनिधी.
साखर कारखाण्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यात आजरा. – गडहिंग्लज – ते आजरा आंबोली रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तर खड्ड्यांमधून ट्रॅक्टर चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवायला लागत आहेत.
यामध्ये रस्त्याची डागडुजी देखील काही प्रमाणात चालू आहे. येणाऱ्या चार आठ दिवसात तात्पुरती चाललेली रस्त्याची मलमपट्टी काही काळ टिकेल डांबराचा वापर कमी असल्यामुळे हा रस्ता फार काळ टिकणार नाही. असेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
अशा परिस्थितीत रस्त्याची परिस्थिती असताना दुसरीकडे शेतकऱ्यांची ऊस तोडणी करून घेण्याची धावपळ वर्षभर काबाडकष्ट करून येणाऱ्या उत्पन्नात आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेतकरी धडपडत असतात व ऊस पिक चांगल्या पद्धतीने येण्यासाठी जेवढे कष्ट घेतलं नाही त्यापेक्षा अधिक कष्ट ऊस तोडणी आणून ऊस कारखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी असतं यामध्ये काही ट्रॅक्टर चालक खड्ड्यामधून ट्रॅक्टर चालवताना ट्रॅक्टर मधून उसाच्या मोळी पडत असतात पण ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात न आल्यामुळे त्यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेले असतात अशा परिस्थितीत किंवा ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्या पडलेल्या उसाच्या मोळी पुन्हा ट्रॅक्टर मध्ये न घेता त्या रस्त्याच्या कडेला पडलेले असतात यामुळे ट्रॅक्टर चालकाचे अधिक नुकसान किंवा ट्रॅक्टर मालकाचे होत नसून शेतकऱ्यांचे ऊस मालकाचे यामध्ये नुकसान होत असतं उसाच्या फडामधून उसाचं एक आणि एक कांड जमा करून शेतकरी उसाच्या ट्रॉलीमध्ये व उसाच्या मोळी जर रस्त्याकडेला पडत असतील तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
यामुळे एक तर ऊस मालकांनी ट्रॅक्टर कारखान्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ट्रॅक्टरच्या मागे गेले पाहिजेत किंवा कारखान्याने अशा ट्रॅक्टर चालकांच्यावर कारवाई केली पाहिजेत. कारखाने चालू झाल्यापासून काही ट्रॅक्टर मधून उसाच्या मोळी रस्त्याच्याकडेला पडलेल्या आजही आढळतात. याचा अर्थ शेतकऱ्याचा कुणाला काही पडलेले नाही असाच होऊ शकतो जर आपल्या ट्रॅक्टर मधून एखादी उसाची मोळी पडली असेल तर ती ट्रॅक्टर मध्ये पुन्हा भरून येणं ही त्या वाहन चालकाची जबाबदारी असते.
यासाठी खबरदारी म्हणून ट्रॅक्टर चालकांना सत्तेच्या सूचना कारखानदारांनी दिल्या पाहिजेत अन्यथा यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान होईल. या गोष्टीकडे कारखाना व्यवस्थापनाने लक्ष दिले पाहिजेत व ट्रॅक्टर चालताना सूचना देखील दिल्या आहेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.