ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आणणार- संदेश पारकर.- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि संदेश पारकर यांची सदिच्छा भेट.
कणकवली/प्रतिनीधी.
सिंधुदुर्गातील कार्यक्षम असलेले शिवसनेनेचे नेते संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. पारकर आणि उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट असली तरी सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता कशी येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचे वर्चस्व कसं ठेवता येईल इतर बाबींवर चर्चा करण्यात आली अशी माहिती श्री.पारकर यांनी दिली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते आणि शिवसेनेचे नेते सतीश सावंत, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक,शिवसनेचे नेते संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, सुशांत नाईक आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेकडून कणकवली तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेकडे कशाप्रकारे येतील याकडे शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी लक्ष घातले आहे. कणकवली तालुक्यात होणाऱ्या ५८ ग्रामपंचायती निवडणूक पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती ह्या शिवसेनेकडे येतील असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्गात खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा, विधानसभा मतदारसंघ निहाय्य ओरोस येथे बैठका देखील घेण्यात आल्या.