Homeकोंकण - ठाणेआजरा हायस्कूल आजराच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कलामहोत्सव स्पर्धेसाठी निवड.

आजरा हायस्कूल आजराच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कलामहोत्सव स्पर्धेसाठी निवड.

आजरा हायस्कूल आजराच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कलामहोत्सव स्पर्धेसाठी निवड.

आजरा. – प्रतिनिधी.


येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजराच्या पाच विद्यार्थ्यांची कला उत्सव 2022 या स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे नुकत्याच झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन कला महोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये लोकनृत्य, शास्त्रीय गायन, भुमिका अभिनय, व्दिमीतीय चित्रकला व त्रिमितीय शिल्पकला या कलाप्रकारा मध्ये सहभाग घेतला होता. या पाचही कलाप्रकारांची पुणे येथे होणा-या ऑफलाईन कला महोत्सवासाठी निवड झालेली आहे. यामध्ये लोकनृत्य कला प्रकारात कु आर्या कृष्णा पाटील इयत्ता दहावी मार्गदर्शक शिक्षक एस एस कालेकर , शास्त्रीय गायन-कु साक्षी शेणवी इयत्ता नववी मार्गदर्शक ए एल तोडकर, भुमिका अभिनय कु आर्यन कांबळे इयत्ता नववी मार्गदर्शक व्ही ए पोतदार , व्दिमीतीय चित्रकला कु हर्षदा बापट इयत्ता दहावी व कु नितेश राणे नववी मार्गदर्शक टी एम पाटील ,व वाय ए शेटके यांनी केले तर मुख्याध्यापक शिवाजी येसणे उपमुख्याध्यापक बी एम दरी पर्यवेक्षक श्री एस पी होलम यांनी सहकार्य केले तर संस्थेचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ अनिल देशपांडे सर्व संचालक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.