दादर फुलमार्केट येथील अनधिकृत फेरीवाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास;मनपाची कारवाई योग्यच
मुंबई (शांताराम गुडेकर )
दादर हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण आणि सर्व वस्तू मिळण्यासाठी एकमेव ठिकाण, येथेच फुलांची मोठी बाजारपेठ असल्याने विरार,पनवेल,कल्याण पासूनचे फुल व्यवसाय करणारे व्यसायिक येथे खरेदीसाठी येतात,परंतु सकाळी-संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत फुल विक्री करणारे फेरीवाले गर्दी करतात.त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासी मग त्या महिला,आबालवृद्ध,गरोदर महिला यांना धक्काबुक्की करणे,छेडछाट करणे,चैन,पाकीट चोरीचे प्रमाण राजरोसपणे होत असते.त्यामुळे मुंबई महानगरपालिका वेळोवेळी कारवाई करत असते.परंतु हेच अनधिकृत फेरीवाले त्यांच्याही अंगावर धावून जात असतात.रेल्वे प्रवाशांना देखील दमदाटी करत असतात. रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे स्टेशनपासून १५० मीटर लांब अधिकृत व्यवसायिक व्यवसाय करू शकतात.परंतु दादरमध्ये मात्र रेल्वेचे नियम धाब्यावर बसवून खुलेआम अनधिकृत व्यवसाय सुरू असतात.
अलीकडेच दादरमधील काही फेरीवाल्यांची उच्च न्यायालयाचा दरवाजा टोकावला आणि मुंबई महानगरपालिका मुद्दाम कारवाई करत आहेत असे सांगून त्यांनी १४ दिवसासाठी स्थगिती मिळवली आहे,मात्र हे सर्व फेरीवाले अनधिकृत आहेत,तसेच रेल्वेलगत असलेली जागा ही मुंबई महानगरपालिका यांच्या ताब्यात असताना येथील फेरीवाल्यांनी ती खाजगी असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून मा.उच्च न्यायालयाची पूर्णपणे दिशाभूल केली आहे. खरेतर मिळाल्या माहितीनुसार येथील रस्त्यावर धंदे करणाऱ्या बरेच फेरीवाल्यांचे परवाने रद्द झालेले आहेत. कारण येथे दादर पूर्व-पश्चिम असा जोडलेला जुना पादचारी पूल आणि हे अनधिकृत फेरीवाले यांनी रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे दिसून येत होते. त्याचबरोबर मुंबई महानगर पालिका करत असलेली कारवाई योग्यच असल्याचे येथील नेहमी ये-जा करणारे प्रवासी सांगत आहेत.
त्याचबरोबर मुंबई मनपा करत असलेली कारवाई योग्यच आहे.त्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. असेही सांगायला प्रवासी विसरले नाहीत.
चौकट
कारवाई योग्यच
दादर स्टेशन परिसरात विशेष करून फुलमार्केट मध्ये नेहमीच गर्दी असते,येथून महिला किंवा कुटूंबासोबत चालणे देखील खूप त्रासदायक वाटते.येथे या गर्दीत अनेकवेळा प्रवाशांच्या खिशातील पाकिटे, गळ्यातील चैन चोरी झाल्याचे मी स्वतः पाहिले आहे.यावर रेल्वे किंवा पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत,मात्र बी एम सी कडून कारवाई होते तेव्हा हे लोक माल वाचवण्यासाठी लपून बसतात.त्यामुळे जी कारवाई होत आहे ती योग्यच असल्याचे नेहमी प्रवास करणारे साहित्यिक,कवी गजानन तुपे यांनी सांगितले.
चौकट
आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर कारवाई करावीच लागते.त्यामुळे सर्वसामान्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पदपथावर अनधिकृत व्यवसाय करण्यास मनाई असताना हे लोक खुलेआम व्यवसाय करतात. चालण्यासाठी असलेला रस्ता मोकळा नसेल तर लोक तक्रारी करतात व त्यामुळे आम्हाला कारवाई करावीच लागते असे नाव न सांगण्याचा अटीवर अधिकारी सांगत होते.
खालील बातमी पहा..
ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आणणार- संदेश पारकर.- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. – पारकर यांची सदिच्छा भेट.
देशासह, प्रामुख्याने महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, प्रलंबित प्रश्न, राजकीय घडामोडी सविस्तर बातमी सर्वात जलद..वाचा.. विविध बातम्या व जाहिरातीसाठी आजच खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
व्हाट्सअप.. ७८७५७८५५१०, मो. ९४०५२४१६६३.. पहा तर सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र… निर्भिड – सत्यता. ✍🏼✍🏼 फक्त बातमी नाही..विश्वास…सत्य व रोख – ठोक घडामोडी…. बातमी लाईक करा, शेअर करा व वरील ☝️ लिंक वर जाऊन बातमी वाचा..