अशोक चराटी यांना विधान परिषदेवर घ्यावे. – वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांची मागणी.
( अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा ६५ वा वाढदिवस उत्साहात साजरा. )
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील धडपडणारे नेतृत्व म्हणजे अशोक चराटी आहे. त्यांनी अण्णाभाऊंचा वारसा जपला आहे. प्रचंड निर्णय क्षमता व विकास कामाबद्दल आवड असणाऱ्या अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांना विधान परिषदेवर घेतल्यास आम्हाला देखील आनंद होईल असं वक्तव्य माजी मंत्री भरमुअण्णा पाटील अशोक चराटी यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. स्वागत व प्रस्ताविक इंजि. विजयकुमार पाटील यांनी केले. पुढे श्री पाटील म्हणाले माझ्या काळातील मंत्री असताना सर्व सूत्रे ही अशोक चराटी यांच्या हातात दिली होती. त्याकाळी काम करत असताना सर्पनाला, उचंगी असे काही प्रकल्प राजकीय विरोधामुळे थांबले चंदगड तालुक्यासह आजरा तालुक्यातील प्रकल्प पूर्ण होऊन मुबलक पाणी मिळावे व शेतकरी सुखी व्हावा. यासाठी कृष्णा खोरे ची स्थापना करून त्या माध्यमातून शेतकरी सुखी व्हावा. यासाठी काम केले पण ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आमदार झालो त्यांचं भलं केले पाहिजेत हीच आमची त्यावेळी भावना होती. व आजही तालुक्याचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न असतो असे श्री पाटील बोलताना म्हणाले.

यावेळी शिंदे गटाचे आम. प्रकाश आबिटकर म्हणाले आजरा तालुक्यातील होऊन गेलेले सर्व ज्येष्ठ नेते हे सामाजिक बांधिलकी जपणारे, तालुक्याचा विकास व सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवत असणारे होते तोच वसा सध्याच्या नेत्यांनी जपला आहे परंतु अशोक अण्णा यांच्याकडे सर्व नेत्यांचे ज्येष्ठत्व असल्यामुळे ते नेहमी विकासाचे स्वप्न साकार करण्याची अपेक्षा ठेवतात परिणामाने परिणाम सांभाळणारे नेते म्हणजे अशोक चराटी आहेत. आजरा तालुक्यातील विकासाचा कार्यक्रम लवकरच मुख्यमंत्री यांच्या हस्ते करू उसाची उणीव पूर्ण होईल पाण्याचे चांगल्या पद्धतीने नियोजन करू व पाणी प्रश्न लवकरच निकालात निघेल या सकारात्मक भूमिकेने आपल्या सर्वांसोबत काम करु, असे आम. श्री आबिटकर बोलताना म्हणाले.

यावेळी चंदगड विधानसभेचे राष्ट्रवादीचे आम. राजेश पाटील म्हणाले चंदगडच्या राजकारणात आजऱ्याचा मोठा समावेश राहिला आहे. अशोक चराटी यांनी जरी माझ्या विरोधात निवडणूक लढवली असली तरी त्यांनी निवडणूक लढवली म्हणून मी आज आमदार आहे. तुम्ही निवडणूक लढवणार नसता तर मी आमदार नसतो परंतु आमची इच्छा हीच राहील आपण एक वेळ विरोधात असलो तरीही विधान परिषदेवर आपण गेलात तरीही आमच्या तुम्हाला शुभेच्छा असतील व आमची इच्छा हीच आहे आपण एक वेळ आमदार व्हाव पण विधान परिषदेवर यापूर्वी आपण सर्वांनी मला साथ दिली यापुढेही द्यावी.
( आम. राजेश पाटील यांनी शिरसंगी ते मलिग्रे रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाला असल्याचे यावेळी सांगितले. )

यावेळी जि.प.चे उपाध्यक्ष व आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले आजरा सारख्या डोंगराळ तालुक्याला विकासाच्या दृष्टीने पाहिले पाहिजेत शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन ही शेती आहे. यासाठी उर्वरित प्रकल्पाची कामे मार्गी लागून शेतकरी सुखी झाला पाहिजे हीच आमची प्रमुख भूमिका आहे. तालुक्याचा विकासाच्या दृष्टीने आमची पावले नेहमी असतात. व अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जनता बँकेचे चेअरमन व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई बोलताना म्हणाले अशोक चराटी हे माझे चांगले मित्र आहेत. राजकीय विरोधक असतो तरी आमचे मतभेद कधीच नव्हते. आमची मैत्री अखंड आहे. पण अशोक चराटी हे अजब रसायन झपाट्याने काम करण्याची प्रवृत्ती व हातात घेतलेले काम पूर्ण करेपर्यंत शांत न बसणारे व्यक्तिमत्व. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी तलाठी यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यास आम्हालाही आनंद होईल असे श्री देसाई म्हणाले

.
आजरा साखर कारखाना चेअरमन सुनील शिंत्रे म्हणाले निर्भीड व्यक्तिमत्व निर्णय घेऊन कामाला लागायचे असं अशोक अण्णांचं नेतृत्व आहे. राजकीय गट बाजूला ठेवून आजरा तालुक्यातील प्रकल्पाचे काम मार्गी लागले पाहिजेत यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे हजरा कारखाना सर्वांच्या सहकार्यामुळे चालू झाला यापुढेही सहकार्य रहावं असे श्री शिंत्रे म्हणाले.

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा म्हणाले ६५ वी नंतर राजकीय मतभेद बाजूला ठेवून एक विचाराने काम करायचं ठरवलं आहे. राजकीय हेतू तरी वेगळा असला तरी मुख्य हेतू हा तालुक्याचा विकास असतो अशोक चराटी हे गतिमान नेतृत्व आहे., त्यांना वाढदिवसाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा यावेळी श्री डिसोजा यांनी दिल्या.
यावेळी व्यासपीठावर सुधीर कुंभार राजेंद्र सावंत, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, अंशुमाला पाटील, आजरा अर्बन, आजरा सूतगिरण, अण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्व संचालक, सर्व कर्मचारी, चराटी व शिंपी गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैया टोपले यांनी केले तर आभार राजु पोतनीस यांनी मानले.
{ व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते तालुक्याचे अध्यक्ष तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या वाढदिवस सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. }
[ सर्वच नेत्यांकडून अशोक सराटी यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस करण्याची मागणी. ]

वाढदिवसाला उत्तर देताना अशोक चराटी म्हणाले आजरा तालुक्यासाठी विकासासाठी जे करायचे आहे ते सर्वांनी एकत्र येऊन चांगलं करूया आजरा शहराची पाण्याची योजना १३५ लिटर पाणी दिले पाहिजेत ३२ कोटीची अमृत योजनेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजेत आजरा तालुका सोबत नगरपंचायत च्या माध्यमातून आजरा शहराचा विकास झाला पाहिजे इतकंच माझं स्वप्न आहे. आपण सर्वांनी विधानपरिषद पाठवण्यासाठी व वाढदिवसासाठी मला शुभेच्छा दिल्यात मी आपला सर्वांचा आभारी असल्याचे बोलताना श्री चराटी म्हणाले
आमदार प्रकाश आबिटकर यांना लवकरच मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी रवळनाथ चरणी प्रार्थना करू असेही उपस्थित काही नेते मंडळी यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केली
