Homeकोंकण - ठाणेवन्यप्राणी रानडुकराचे कच्चे व भाजलेले मास सापडले प्रकरणी - चंदगड येथील आरोपींवर...

वन्यप्राणी रानडुकराचे कच्चे व भाजलेले मास सापडले प्रकरणी – चंदगड येथील आरोपींवर वन्यजीवी संरक्षण १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल.

वन्यप्राणी रानडुकराचे कच्चे व भाजलेले मास सापडले प्रकरणी – चंदगड येथील आरोपींवर वन्यजीवी संरक्षण १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल.

चंदगड. – प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चंदगड पैकी देसाईवाडी येथे रानडुक्कर या वन्य प्राण्यांच्या मासाची अवैधरित्या विक्री करत असल्याचे गुप्त माहिती वरून मनोहर शंकर चंदगडकर यांचे मौजे चंदगड पैकी देसाईवाडी येथील मालकी गट नंबर ३४५ मध्ये वन विभागाच्या पथकाने धाड टाकली असता आरोपी १) मनोहर शंकर चंदगडकर वय ५१ ब्राह्मण गल्ली चंदगड आरोपी २) नितीन उर्फ दत्तात्रेय नामदेव लोहार वय ४६ रवळनाथ गल्ली चंदगड आरोपी ३) समीर मारुती चंदगडकर वय ४२ रा. देसाईवाडी चंदगड आरोपी क्रमांक चार तुकाराम गुंडू देसाई वय ४९ ब्राह्मण गल्ली चंदगड हे रानडुक्कर या वनप्राण्याचे मासाची विक्री करून करण्याच्या उद्देशाने रानडुकराच्या मासाचे तुकडे करत असता जागेवर मिळून आले वरील चौघांना चौकशी कामी वनविभाग पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी ताब्यातून रानडुक्कर या वन प्राण्याचे कच्चे व भाजलेले मास ६५ किलो १०० ग्रॅम पुण्यात वापरले साहित्य हत्यारे जप्त करण्यात आले आहेत सदरची कारवाई के. एस. डेळेकर वनपाल, चंदगड ए. डी. वाजे. वनपाल कानुर , बी.आर. निकम वनपाल मिरवेल, एस. आर. पवार वनरक्षक चंदगड, के.जी.कातखडे वनरक्षक के आर सानप वनरक्षक, ए डी सांगळे वनरक्षक, ए. एस. घोरपडे,वनरक्षक श्रीमती एस एस सरवदे वनरक्षक के. एस. पताडे वनरक्षक बी.एस.कांबळे वनसेवक, आदींनी कारवाई केली सदर गुण्याचा तपास वनरक्षक कोल्हापूर जी. गुरुप्रसाद सहाय्यक वनरक्षक, वन्यजीव विभाग नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चंदगड अधिक तपास करत आहेत तसेच सदर गुन्हा प्रकरणी तपास सुरू आहे आज दिनांक १२ रोजी सदर गुन्हा घडला आहे.

आजच्या युगामध्ये वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धन व जैवविविधतेचे जतन करण्याचे काम फक्त वन विभागाचे नसून प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धन व जैवविविधतेचे जतन करणे कामी वन प्राण्यांचे अवैध शिकार व अवैध वृक्षतोड अवैध अतिक्रमण होत असेल तर तात्काळ परिक्षेत्र अधिकारी त्यांचे कार्यालय चंदगड अथवा वनविभाग कोल्हापूर कडे माहिती देण्यात यावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.