“बुद्धिमत्तेचा वापर व्यवहारी जीवनात करता येणं आवश्यक!” – डाॅ. मारुती डेळेकर.
आजरा. – प्रतिनिधी.
“बुद्धिमत्तेचा वापर व्यवहारी जीवनात करता येणं आवश्यक आहे, अन्यथा हीच बुद्धिमत्ता आपल्यावरच उलटू शकते.” असे उद्गार डाॅ. मारुती डेळेकर यांनी काढले. दिवाळी महोत्सवानिमित्त ‘माझा गाव, माझा अभिमान’ या ग्रुपच्या माध्यमातून आयोजक रणजित कमलाकर भादवणकर यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. देवर्डे शाळेमध्ये संपन्न झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रवळनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष सावंत होते. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक सुनील सुतार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्पर्धेसह सर्वच उपक्रमांचा आढावा घेतला. ‘माझा गाव, माझा अभिमान’ या ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत सुमारे शंभर विद्यार्थी, रांगोळी स्पर्धेत सुमारे पन्नास स्पर्धक तर किल्ला स्पर्धेत सोळा स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धांबरोबर आजरा तालुक्यातील पहिलेच मोफत औषधोपचारासहित आरोग्य शिबिर घेण्यात आले. नामांकित व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने घेतलेल्या या शिबिरामध्ये सुमारे ३०० रुग्णांनी लाभ घेतला असून या शिबिरामध्ये ‘माझा गाव, माझा अभिमान’ या ग्रुपच्या वतीने सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीची औषधे कोणत्याही शुल्काविना वितरित करण्यात आली. तसेच या आरोग्य शिबिरास जोडून रक्तदान शिबिराचा उपक्रमही तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून पार पाडला. म्हणून या ग्रुपच्या सर्व तरुणांचे जाहीर कौतुक सुनील सुतार यांनी प्रास्ताविकामधून केले. या समारंभास उपस्थित असणारे गटशिक्षणाधिकारी बी.सी. गुरव व विस्तार अधिकारी विलास पाटील यांनीही या ग्रुपचे कौतुक केले. तत्पूर्वी या मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन प्रथमेश मळेकर, शुभम बुरुड, समर्थ बुरुड, अक्षय जाधव, शरद चाळके, विकास मळेकर, प्रतीक इक्के, सिद्धार्थ मोरे, संकेत सोले, कुणाल बागडी आदि तरुणांनी केले. या वेळी मुख्याध्यापक नामदेव माईनकर, चंद्रकांत घुरे, महेश नावलगी, संयोगिता सुतार, सरोजिनी कुंभार, महादेव तेजम, रेश्मा बोलके, वंदना चव्हाण, ज्ञानदेव चाळके यांचेसह पालकही उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धा. – पहिली – दुसरी.
प्रथम. – आदर्श धनाजी चाळके.
द्वितीय. – स्नेहल विलास तानवडे
तृतीय. आरोही दीपक पाटील.
तिसरी-चौथी.- प्रथम.
समृद्धी आनंदा भादवणकर.
द्वितीय.- कस्तुरी उत्तम जाधव.
तृतीय. -रुद्र रवींद्र नालंग.
पाचवी ते सातवी. –
प्रथम.- श्रेयस अंकुश तानवडे
द्वितीय. – नंदिनी राजेंद्र पाटील.
तृतीय. – सायली संदीप कांबळे
आठवी ते दहावी
प्रथम. – हर्षवर्धन प्रशांत लोहार
द्वितीय. – सोहम सुभाष बागडी.
तृतीय. – कौस्तुभ मारुती चाळके
रांगोळी स्पर्धा.
प्रथम. दर्शना रणजित भादवणकर
द्वितीय. -उषा विजय पाटील
तृतीय. – पल्लवी बळीराम तानवडे
किल्ला स्पर्धा.
प्रथम. नवयुवक मित्र मंडळ
द्वितीय. अनिकेत संजय सोले
तृतीय (विभागून)
आयुष मंगेश पाटील व करण आणि अर्जुन हिंदुराव ढोकरे
रणजित कमलाकर भादवणकर
माझा गाव, माझा अभिमान अंतर्गत कार्यक्रम संपन्न